विक्रांत मेस्सीप्रमाणे करिअरच्या उत्तुंग शिखरावर असताना बॉलिवूडचा निरोप घेणाऱ्या १० सुपरस्टार अभिनेत्री, आज कुणी खुश तर कुणी... Published:December 3, 2024 01:23 PM 2024-12-03T13:23:25+5:30 2024-12-03T14:02:50+5:30
These 10 Bollywood Celebs Who Left Films At The Peak Of Their Career : 10 Indian Bollywood Actresses Left Showbiz At Peak : बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देत अचानकपणे आपल्या करिअरला फुलस्टॉप देणाऱ्या त्या अभिनेत्री कोण ? आजच्या या झगमगत्या बॉलिवूडच्या फिल्मी दुनियेत एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकण्यासाठी प्रत्येकजण आपले नशीब आजमावत असतो. या सतत झगमगाट असणाऱ्या आणि ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी अनेकजण अतोनात प्रयत्न करतात. आजही अनेक सेलेब्स असे आहेत ज्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला खूप अडचणीं आणि संघर्षाचा सामना करावा लागला, पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना यश मिळत होते, परंतु नेमकं त्याचवेळी त्यांनी आपलं करिअर आणि काम करणं थांबवलं.
बॉलिवूड मधील उगवता तारा विक्रांत मेस्सीने नुकतेच बॉलिवूडमधून निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे. त्याच्याप्रमाणेच बॉलिवूडमधील इतरही अभिनेत्री ( 10 Indian Bollywood Actresses Left Showbiz At Peak) अशा आहेत ज्यांनी अचानकपणे आपल्या करिअरला फुलस्टॉप दिला आहे. त्या अभिनेत्री नेमक्या कोणत्या ते पाहूयात.
१. ट्विंकल खन्ना :-
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना देखील ९० च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. जेव्हा तिने अक्षय कुमारशी लग्न केले तेव्हा ती तिच्या करिअरच्या उंच शिखरावर होती आणि त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.
२. असिन :-
असिनने २००१ ते २००८ पर्यंत अनेक मल्याळम, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अमीर खानसोबत हिट फिल्म देणारी गजनी फेम असिन हिचे देखील या यादीत नाव घेतले जाते. बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्याचवेळी लग्न केल्यानंतर असिनने बॉलिवूड इंडस्ट्री सोडली.
३. अभिनेत्री ईशा कोप्पीकर :-
अभिनेत्री ईशा कोप्पीकरला बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट करूनही यश मिळवता आले नाही, त्यामुळे तिने यापुढे चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
४. तनुश्री दत्ता :-
तनुश्री दत्ता ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजही आपल्याला तिच्या 'आशिक बनाया' या चित्रपटातील हिट गाणे ऐकायला आवडते. परंतु तनुश्रीने २०१० साली अपार्टमेंट या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. यानंतर तिने स्वतःला फिल्मी जगापासून फार दूर ठेवले.
५. नीलम कोठारी :-
अभिनेत्री नीलम कोठारी या देखील बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का दिला.
६. आयेशा टाकिया :-
आयेशा टाकियाने २००४ साली 'टार्झन द वंडर कार' या फेमस बॉलिवूड चित्रपटांतून पदार्पण केले. सगळ्यांत शेवटी ती सलमान खानसोबत 'वॉन्टेड' या चित्रपटात झळकली. त्यानंतर तिने फरहान आझमीसोबत लग्न केले. २०१२ साली ती टॅलेंट शो ची होस्ट होती त्यानंतर तिने बॉलिवूड इंडस्ट्री सोडली.
७. गायत्री जोशी :-
गायत्री जोशी हिने २००५ साली आशुतोष गोवारीकर यांच्या 'स्वदेस' या फक्त एकाच चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केले आहे. त्यानंतर लगेचच, तिने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले आणि बॉलिवूडमधून रिटायर्डमेंट घेतली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती चॅनल V वर व्हिडिओ जॉकी आणि लोकप्रिय मॉडेल होती.
८. भाग्यश्री :-
सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटांत सलमान खानसोबत अभिनय केलेली भाग्यश्री रातोरात सुपरस्टार बनली. परंतु तिचा मुलगा अभिमन्यू दासानीच्या जन्मामुळे भाग्यश्रीने तिच्या पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूड सोडले.
९. नीतू कपूर :-
नीतू कपूर ही तिच्या काळातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक होती. अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर आणि अनेक पुरस्कार जिंकल्यानंतर तिने ऋषी कपूरसोबत लग्न केले आणि वयाच्या २१ व्या वर्षी इंडस्ट्री सोडली. एका मुलाखतीत, ती म्हणाली, “माझ्या करिअरचा त्याग करणे हा माझा निर्णय होता. मला कुटुंब हवे होते. मला काम करून खूप कंटाळा आला होता, मी माझ्या सात वर्षांच्या कारकिर्दीत दररोज तीन शिफ्टमध्ये जवळपास ७० चित्रपट केले होते.
१०. नर्गिस :-
रतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक, नर्गिसने रुपेरी पडद्यावर मदर इंडिया, रात और दिन यासारखे एकामागून एक हिट चित्रपट दिले. मात्र, तिने सुनील दत्तसोबत लग्न केल्यानंतर कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इंडस्ट्री सोडली.