Join us   

घर सुंदर सजवण्याच्या १० टिप्स, फक्त १००० रुपयांत उजळेल तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 5:26 PM

1 / 12
आपलं घर नेहमी सुंदर व नीटनेटकं असावं असं प्रत्येकालाच वाटत. परंतु घराची सजावट करणे किंवा घराला नवीन लूक देणे ही खर्चिक गोष्ट असते. त्यामुळे प्रत्येकालाच सहज शक्य होईल असे नाही.आपल्या घराची सजावट करताना काही लहान लहान गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला तर कमी खर्चात आपले घर सुंदर दिसू शकते. बदलत्या काळासोबतच सजावटीचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यांचा वापर केल्यास घराला एक फ्रेश लूक देता येईल(Home Decoration Ideas).
2 / 12
तुमच्या घराचे प्रवेशद्वार हे आकर्षक असावे. मुख्य दरवाजा हा तुमच्या घराचा केंद्रबिंदू असतो. मुख्य दरवाजातूनच प्रवेश केला जातो. प्रवेशद्वाराच्या सजावटीवरूनच आतील घर कसे असेल याचे आडाखे बांधले जातात. म्हणून प्रवेशद्वार स्वतःच्या आवडीनुसार सजवा. घराच्या मुख्य दारात अस्ताव्यस्तपणा नसावा. घरात येणाऱ्यांचे चित्त प्रसन्न राहील अशी व्यवस्था ठेवावी
3 / 12
घरात झाडे किंवा रोपं लावल्याने ती हवा शुद्ध करतात तसेच ती घराची शोभा वाढवतात. ही झाडे लावताना तुम्ही वेगवेगळ्या रंगांची आकाराची झाडे लावू शकता. झाडे लावताना रंगीबेरंगी कुंड्या किंवा ज्यूटच्या कुंडीचा वापर करा. जेणेकरून मातीने घरातली फरशी खराब होणार नाही. बेडरूमच्या बाल्कनीत, खिडक्यांच्या शेजारी अशी रोपटी खूप सुंदर दिसतात. सध्या हँगिंग प्रकारातील रोपट्यांकडे लोकांचा कल अधिक आहे.
4 / 12
घरातील खिडक्यांना मॅचिंग रंगाचे पडदे लावा. निरनिराळ्या रंगांच्या उश्या आणि टॉसेल्सच्या मदतीने असे सजवा. कुंडय़ांमध्ये लहान लहान रोपं किंवा हर्बस् लावून खिडकीवर ठेवावेत.
5 / 12
जर तुम्ही योग्य प्रमाणात लाईटिंगचा वापर केला तर तुमचे घर अधिकच आकर्षक दिसेल. सुंदर लाईटिंग घराला एक फ्रेश आणि तेजस्वी लूक देईल. घरात एखाद्या कोपऱ्यात नवीन वेगळ्या आकाराचा किंवा पांढऱ्या रंगातला एखादा फ्लोअर लॅम्प ठेवावा.
6 / 12
घराची सजावट केवळ घराच्या आतील भागापुरतीच मर्यादित नसावी. घराच्या बाहेरचा परिसर देखील तुमच्या आवडीनुसार सजवा.
7 / 12
घरातील बेडरूम मोकळा व हवेशीर असला पाहिजे. बेडरूममध्ये जास्त सजावट न करता तो जितका सिंपल ठेवता येईल तितका सिंपल ठेवा. घराच्या बेडरूममध्ये आरामदायक फील येणं गरजेचं असत. बेडरुमला रंग देताना रात्रीच्या वेळी शांततेचा अनुभव देणारे रंग निवडावेत.
8 / 12
घरातील तुमच्या आवडत्या कोपऱ्यात स्टडी कॉर्नर ठेवा. स्टडी कॉर्नर अश्याप्रकारे सजवा की तिथे अभ्यास किंवा काम करताना तुम्हाला फ्रेश वाटले पाहिजे. स्टडी कॉर्नर अंधाऱ्या कोपऱ्यात करणे टाळा.
9 / 12
घरात नेहमी मंद सुगंधाच्या मेणबत्त्या किंवा फ्रेग्रन्स बॉक्स ठेवा. जेणेकरून वाऱ्याची झुळूक आल्यावर त्याच्यासोबत हा मंद सुवास घरभर पसरेल व तुम्हाला ताजेतवाने वाटेल. घरात मेणबत्ती जळती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते.
10 / 12
तुम्हाला ज्या प्रकारची फुल आवडत असतील अशी ताजी फुल रोज तुमच्या फ्लॉवर्सपॉट मध्ये ठेवा. फुलांनी भरलेल्या फ्लॉवर्सपॉटमुळे तुमच्या घराची शोभा वाढेल.
11 / 12
गालिचे तुमच्या घराची आकर्षकता वाढविण्यात अजून भर घालतील. रूमच्या आकारमानानुसार गालिच्याची निवड करावी. उगाच अवाढव्य गालिचा न घेता दिसायला सुंदर आणि उठावदार हवा.
12 / 12
आपल्या घरातील एक विशिष्ट भिंत आपण सजावटी करता राखून ठेवतो. या भिंतीवर वेगवेगळ्या फ्रेम्स किंवा फॅमिली कोलाज लावावेत. यामध्ये तुम्ही एखादे पेंटिंग लावू शकता अथवा फक्त रिकामी फ्रेम आर्टवर्क म्हणूनही ठेऊ शकता.
टॅग्स : खरेदीसुंदर गृहनियोजन