९० % लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात 'या' गंभीर चुका! तुमचंही चुकतंय, देताय मोठ्या आजारांना आमंत्रण

Updated:April 12, 2025 16:56 IST2025-04-11T19:09:19+5:302025-04-12T16:56:21+5:30

९० % लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात 'या' गंभीर चुका! तुमचंही चुकतंय, देताय मोठ्या आजारांना आमंत्रण

मायक्रोवेव्ह वापरल्यामुळे आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. अन्न गरम करणे, भाज्या उकडणे, काही पदार्थ भाजून घेणे अशी कित्येक कामं अगदी चुटकीसरशी मायक्रोवेव्हमुळे होऊन जातात.

९० % लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात 'या' गंभीर चुका! तुमचंही चुकतंय, देताय मोठ्या आजारांना आमंत्रण

मायक्रोवेव्ह सुरक्षित पद्धतीने वापरले गेले तर ते आपल्या सोयीचेच आहे. पण ते वापरताना जर तुम्ही काही गंभीर चुका नेहमीच करत असाल तर त्याचा मात्र तुमच्या आणि तुमच्या कुटूंबियांच्या आरोग्यावर खूप विपरित परिणााम होऊ शकतो. त्या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूया...

९० % लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात 'या' गंभीर चुका! तुमचंही चुकतंय, देताय मोठ्या आजारांना आमंत्रण

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हल्ली हॉटेलमधून अन्न पदार्थ मागविण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अन्न पदार्थ ज्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये येतात ते कंटेनर जसेच्यातसे मायक्रोवेव्हमध्ये ठेवले जाते आणि अन्न पुन्हा गरम केले जाते. हे कंटेनर प्लास्टिकचे असल्याने अशा पद्धतीने मायक्रोवेव्हमध्ये ते गरम करण्यासाठी ठेवणे तब्येतीसाठी खूप हानिकारक ठरू शकते.

९० % लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात 'या' गंभीर चुका! तुमचंही चुकतंय, देताय मोठ्या आजारांना आमंत्रण

ॲल्युमिनियम फॉईलमध्ये असणारे अन्नपदार्थही अनेक जण जसेच्या तसे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करतात. असं करताना फॉईल गरम होऊन त्यातले काही सुक्ष्म कण अन्न पदार्थांमध्ये मिसळले जातात. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

९० % लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात 'या' गंभीर चुका! तुमचंही चुकतंय, देताय मोठ्या आजारांना आमंत्रण

मेटालिक डिझाईन असणारे काचेचे किंवा प्लास्टिकचे भांडेही मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नयेत.