1 / 6बरेच लोक नियमितपणे मध खातात. मध आणि कोमट पाणी एकत्रित पिऊनच अनेकांचा दिवस सुरू होतो. पण आपण आरोग्यदायी समजून जो मध खात आहोत तो भेसळीचा तर नाही ना याची खात्री एकदा करून घ्यायलाच हवी..2 / 6म्हणूनच मध शुद्ध आहे की भेसळीचा आहे हे ओळखण्यासाठी या काही खास टिप्स.. या टिप्स आहारतज्ज्ञांनी dimplejangdaofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केल्या आहेत. 3 / 6पहिली गोष्ट म्हणजे ग्लासभर पाण्यात चमचाभर मध टाकून तो हलवा. जर तो विरघळला तर तो भेसळीचा आहे. कारण शुद्ध मध पाण्यात विरघळत नाही.4 / 6मधाचा एक थेंब पेपर नॅपकिनवर घ्या. जर त्यावर डाग पडला तर तो मध भेसळीचा आहे. 5 / 6थोडासा मध चमच्यामध्ये घ्या आणि त्याला गॅसवर गरम करा. जर त्याचा पाक झाला आणि त्यातून छान सुगंध आला तर तो मध शुद्ध आहे.6 / 6व्हिनेगरमध्ये मधाचे काही थेंब टाका. जर ते थेंब फसफसले तर तो मध शुद्ध नाही. कारण शुद्ध मध व्हिनेगरमध्ये फसफसत नाही.