लोलो करिष्मा कपूरचा आज वाढदिवस, वाचा करिष्माच्या आयुष्यातील अननोन गोष्टी, करिनाही म्हणाली.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 4:40 PM 1 / 10१. ९० च्या दशकातली आघाडीची अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. कपूर कुटूंबात आणि बॉलीवूडमध्येही करिष्मा कायम एक ट्रेण्डसेटर म्हणून ओळखली गेली. म्हणूनच तर आज तिच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त धाकटी बहिण करिना कपूर हिनेही तिला ‘pride of our family’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 10२. शो मॅन राज कपूर यांची नात आणि रणधीर कपूर- बबिता यांची ही लाडकी लेक. तिला लोलो हे नाव कसं पडलं, याचं अनेकांना कुतूहल वाटतं. तिच्या या नावाचं कारण आहे तिची आई बबिता. बबिता यांनी Gina Lollobrigida या हॉलीवूड अभिनेत्रीच्या नावावरून करिष्माला लोलो म्हणायला सुरुवात केली आणि पुढे ती त्याच टोपन नावाने ओळखली जाऊ लागली.3 / 10३. चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी करिष्मा ही कपूर खानदानातली पहिली मुलगी. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता.4 / 10४. यानंतर करिष्माने अनेक चित्रपट केले आणि यापैकी तिचे बहुतांश चित्रपट हिट ठरले. ९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते. 5 / 10५. राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या यशाने करिष्माला करिअरमध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण खरे पाहता या चित्रपटातली भुमिका तिच्यासाठी तयार करण्यात आलेली नव्हतीच. ऐश्वर्या राय या चित्रपटासाठी पहिली पसंती होती. पण तिने नकार दिल्यानंतर हा चित्रपट करिष्माकडे आला होता.6 / 10६. असंच काहीसं दिल तो पागल है या चित्रपटाचं होतं. या चित्रपटात करिष्माने साकारलेल्या भुमिकेसाठी सगळ्यात आधी रविना टंडनला विचारण्यात आलं होतं. तिच्यानंतर जुही चावला, काजोल, मनिषा कोईराला, शिल्पा शेट्टी यांनाही विचारण्यात आलं. त्यांचा नकार मिळाल्याने सगळ्यात शेवटी ही भूमिका करिष्माकडे गेली. पण तिने मात्र त्याचं सोनं करून दाखवलं.7 / 10७. करिष्मानेही अनेक चित्रपट सोडले जे भविष्यात हिट ठरले. यापैकी सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट म्हणजे कुछ कुछ होता है.. यातला राणी मुखर्जीचा रोल करिष्माने करावा, असं करण जोहरला वाटत होतं. पण करिष्मा त्या काळात करिअरमध्ये एका चांगल्या उंचीवर होती. त्यामुळे तिने टिना हा साईड रोल करायला नकार दिला.8 / 10८. करिअरमध्ये अतिशय यशस्वी ठरलेली करिष्मा रिलेशनशिपच्या बाबतीत मात्र अपयशी ठरली. अभिषेकसोबत तर तिचा साखरपुडा होऊन मोडला. पण त्याआधी अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासोबतही तिचं नाव जोडल्या गेलं होतं. एवढंच नाही तर सलमान खानसोबतही तिचं नाव जोडलं गेलं. पण यापैकी कोणतंही रिलेशन पुढे जाऊ शकलं नाही.9 / 10९. अभिषेकशी साखरपुडा मोडल्यानंतर २००३ साली तिनं अतिश्रीमंत उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केलं. त्यांना समायरा आणि किआन ही दोन मुलंही आहेत. पण २०१६ साली दोघांनी घटस्फोट घेतला..10 / 10 १०. आता करिष्माचं चित्रपटांमधून झळकणं खूप कमी झालं आहे. पण असं असलं तरी या कपूर कन्येचं ग्लॅमर आणि सौंदर्य मात्र जशास तसं टिकून आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications