किचनमधल्या टाईल्स खूपच मेणचट होतात? ५ गोष्टी लक्षात ठेवा- स्वयंपाक घर नेहमीच राहील लख्खं By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 9:15 AM 1 / 6स्वयंपाक घरातल्या किचन ओट्याच्या आसपासच्या, गॅस शेगडीजवळच्या टाईल्स खूपच मेणचट होतात असा अनुभव आपण नेहमीच घेतो. म्हणूनच स्वयंपाक करताना किंवा किचनमध्ये काम करताना या काही टिप्स लक्षात ठेवा.2 / 6तुमच्या गॅस शेगडीची जागा नेहमी खिडकीच्या जवळ असू द्या. अशा पद्धतीने जर गॅस असेल तर व्हेंटीलेशनला वाव मिळतो आणि टाईल्स चिकट होत नाहीत.3 / 6गॅस शेगडीच्या वरच्या बाजूला जर खिडकी असेल तर ती नेहमी उघडीच ठेवा. म्हणजे स्वयंपाक करताना निघणारा धूर थेट खिडकीबाहेर जाईल आणि फरशांवर जास्त तेलकटपणा जमा होणार नाही. 4 / 6जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये एखादा पदार्थ घालाल किंवा पाणी घालाल तेव्हा शक्यतो गॅस मंद ठेवावा. गॅस जर मोठ्या आचेवर असेल तर त्या पदार्थांमधून तेलकट धूर जास्त निघतो आणि तो टाईल्सवर चिटकून बसतो.5 / 6फोडणी दिल्यानंतर एखाद्या झाकणीचा किंवा ताटाचा थोडा आडोसा कढईवर, पॅनवर धरा. जेणेकरून निघणारा तेलकट धूर त्या ताटावर किंवा झाकणीवर जमा होईल आणि थेट भिंतीवर जाणार नाही.6 / 6किचन ओटा आणि गॅस शेगडी जसे रोजच्या रोज धुता तसेच गॅस शेगडीच्यावर असणाऱ्या टाईल्स एक दिवसाआड ओटा पुसताना स्वच्छ पुसून घ्या. यामुळे आपोआपच तेलकट थर साचण्याचे प्रमाण कमी होईल आणि टाइल्स चिकट मेणचट होणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications