1 / 9नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे (Ghat Sthapna 2024). त्यामुळे घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे (preparation for Navaratri Kalash Sthapana 2024). घटस्थापनेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ होऊ नये, एखाद्या गोष्टीसाठी पळापळ होऊ नये म्हणून या ५ गोष्टी आधीपासूनच तुमच्या घरात आणून ठेवा.(5 important things for Navratri 2024)2 / 9त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घट. काही ठिकाणी मातीचा तर काही ठिकाणी, तांबे, पिळत, चांदी किंवा स्टील असा धातूचा घट बसवतात. तुमचा घटाचा कलश व्यवस्थित शाेधून स्वच्छ करून ठेवा. नसेल तर लगेचच आणून घ्या. 3 / 9दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी घटामध्ये नारळ ठेवले जाते तर काही ठिकाणी देवीचा टाक ठेवला जातो. यापैकी जी गोष्ट तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रथेपरंपरेनुसार चालते, त्यानुसार ती घरात तयार ठेवा. 4 / 9धान्य लावण्यासाठी लागणारी माती. हल्ली बाजारात माती विकणारे अनेक जण दिसतात. पण त्यांच्याकडून आणलेल्या मातीत धान्य चांगले उगवत नाही. त्यामुळे तुमच्या शहरातल्या नर्सरीतून माती घेऊन या.5 / 9घटस्थापनेच्या दिवशी लागणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धान्य. काही ठिकाणी सप्तधान्य, काही ठिकाणी पंचधान्य तर काही ठिकाणी नुसते गहू मातीत टाकले जातात. तुमच्या घरातल्या प्रथेप्रमाणे धान्य आणा आणि ते व्यवस्थित पाखडून, निवडून ठेवा. 6 / 9काही ठिकाणी कलशाची स्थापना होत नाही. पण अखंड नंदादीप लावला लातो. तुम्ही जो कोणता दिवा लावणार आहात तो व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा. 7 / 9अखंड नंदादीप लावताना त्याची वात थोडी मोठी असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशी मोठ्या आकाराची वात आधीच तयार करून ठेवा किंवा घरी करता येत नसेल तर विकत आणा. 8 / 9घटामध्ये लावण्यासाठी विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लागतात. ती ५ पानं तुमच्या घरात असू द्या.. 9 / 9बाकी घटस्थापनेच्या पुजेसाठी फुलं, पुजेचं इतर साहित्य लागतेच. पण वर सांगितलेल्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्याने त्या घरात असणं गरजेचं आहे. कारण ऐन घटस्थापनेच्या वेळी या गोष्टींसाठी धावपळ व्हायला नको.