टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

Published:May 31, 2022 06:03 PM2022-05-31T18:03:57+5:302022-05-31T18:09:29+5:30

टॉयलेट बाथरुम साफ करणे स्वच्छतेबरोबरच आरोग्यासाठीही अतिशय गरजेचे असते, ते कसे करायचे याविषयी...

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

घराच्या स्वच्छतेमधील सर्वात महत्त्वाची स्वच्छता असते ती टॉयलेट, बाथरुम आणि वॉश बेसिन या तिन्ही ठिकाणच्या टाइल्सवर कसले ना कसले डाग पडतात. आरोग्याच्यादृष्टीने याठिकाणची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते.

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

दररोजच्या घाईत आपण अनेकदा टॉयलेट-बाथरुम घासणे टाळतो किंवा तात्पुरते साफ करतो (How to clean toilet and bathroom). पण यामुळे याठिकाणच्या टाइल्सना आलेला बर तसाच राहतो. आपण आंघोळ करणे, तोंड धुणे अशा शरीराशी निगडित गोष्टी याठिकाणी करत असतो. त्यामुळे ही जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे.

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

बाजारात टॉयलेट आणि बाथरुम स्वच्छ व्हावे यासाठी जसे वेगवेगळे लिक्वीड मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचे ब्रशही मिळतात. कमोड घासण्यासाठी सगळ्या बाजूला दातरे असणारा ब्रश असेल तर कडेला अडकलेली घाण आणि डाग निघण्यास मदत होते. अगदी रोज जमले नाही तरी किमान दोन ते ३ दिवसांनी टॉयलेट घासली तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

सततचा वापर, बोअरचे पाणी आणि इतरही अनेक कारणांनी टॉयलेटमधले डाग निघण्यास त्रास होतो. अशावेळी टॉयलेट आणि बाथरुम साफ करण्यासाठी हायड्रोक्लोरीक अॅसिडचा वापर करावा. तसेच हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन क्लिनरही मिळतात, ते वापरावेत. 

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

बाथरुममधल्या नळांना गंज लागणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. नळ जुने झाले की पाण्यामुळे ते गंजतात अशावेळी नळ बदलण्याआधी काही सोप्या पर्यायांनी त्यावरील गंज काढता येऊ शकतो. यासाठी लिंबू, बेकिंग सोडा, व्हिनेगर, हायड्रोजन पॅरोक्साईड यांसारख्या गोष्टींचा तुम्ही वापर करु शकता. 

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

बाथरुममध्ये गेल्यावर फ्रेश वाटावं यासाठी याठिकाणी एखादे एअर फ्रेशनर लावणे, सजावट म्हणून एखादा फ्लॉवर पॉट किंवा फ्रेम ठेवणे यामुळे बाथरुमचा लूक बदलू शकतो. तसेच यामुळे आपल्याला सकाळी उठल्या उठल्याही फ्रेश वाटायला मदत होईल.

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

आपण अनेकदा बाथरुम किंवा टॉयलेट धुण्यासाठी एखादे लिक्विड किंवा वासाचे फिनाईल वापरतो. पण त्याबरोबरच एखादवेळी कपड्याची किंवा भांड्याची पावडर या फरशीवर टाकून टॉयलेट-बाथरुमची फरशी स्वच्छ केल्यास त्याने साफ होण्यास आणखी मदत होते. बाथरुमसाठी एखाद्या स्लीपर ठेवल्यास पाय आणि फरशी दोन्हीही खराब होणार नाही.

टॉयलेट-बाथरुम चकचकीत स्वच्छ करण्यासाठी ५ परफेक्ट उपाय; घरभर दुर्गंधी-इन्फेक्शन टाळा

टॉयलेट आणि बाथरुमबरोबरच याठिकाणी असलेले वॉश बेसिनही साफ करायला हवे. याठिकाणी आपण ब्रश करणे, तोंड धुणे, हात धुणे अशा सगळ्या गोष्टी दिवसातून कित्येकदा करत असतो. बेसिन स्वच्छ असेल तर आपल्यालाही चांगले वाटते. त्यामुळे लिक्विड आणि गॉजने बेसिन नियमीत स्वच्छ करायला हवे.