1 / 8आपल्यापैकी अनेकांच्या घरात मायक्रोवेव्ह वापरला जातो. अगदी जेवण गरम करण्यापासून अनेक बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर करतात. (things not to put in microwave)2 / 8मायक्रोवेव्हचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास आपले मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी त्याचा योग्य प्रकारे वापर करायला हवा. (is it safe to boil in microwave)3 / 8बदलत्या काळानुसार स्वयंपाकघरातील उपकरणांमुळे अनेक कामे सोपी आणि जलद झाली आहे. त्यात ग्राइंडर असो, मिक्सर असो किंवा मायक्रोवेव्ह असो. त्याचा चुकीचा वापर केल्यास आपल्याला नुकसान होऊ शकते.( what not to boil in microwave) 4 / 8मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकडू नका. वाफेमुळे दाब येतो, ज्यामुळे टरफले फुटतात आणि स्फोट होण्याचा धोका वाढतो. 5 / 8मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम करु नका. बाहेरुन थंड वाटत असले तरी दूध आतून जास्त प्रमाणात गरम होते. ज्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होतात. 6 / 8जर आपण प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असू तर नुकसान होऊ शकते. काही प्लास्टिक कंटेनर बीपीए आणि इतर विषारी रसायने सोडतात. ज्यामुळे शरीराला नुकसान होते. 7 / 8मायक्रोवेव्हमध्ये मिरची गरम केल्याने त्यात असणारे कॅप्सेसिन हवेत पसरते. मिरच्या गरम केल्याने भरपूर वाफ निर्माण होते. दाबामुळे कधीकधी मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडू शकतो. 8 / 8पाणी गरम करण्यासाठी अनेकदा मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. यात पाणी गरम करताना ते उकळले जात नाही. ज्यामुळे गळतीची शक्यता जास्त असते.