1 / 9'फ्रिज' ही किचनमधील सर्वात महत्वाची वस्तू आहे. फ्रिजचा वापर (What is the best odor remover for a refrigerator) रोज केला जातो. फ्रिजमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने ते खराब न होता दीर्घकाळासाठी चांगले टिकून राहतात. असे असले तरीही काहीवेळा आपण फ्रिजमध्ये अन्नपदार्थ ठेवतो आणि काही दिवसांनी विसरुन जातो. यामुळे काही अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवून कुजतात किंवा खराब होतात. असा फ्रिज अधिक काळ साफ न केल्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरते. यासाठीच फ्रिज वेळच्यावेळी स्वच्छ केला पाहिजे. 2 / 9आपण देखील रेफ्रिजरेटरच्या दुर्गंधीमुळे (6 Best Ways to Rid Your Refrigerator of Smells) हैराण असाल, तर फक्त चमचाभर चहा पावडरचा वापर करून आपण फ्रिजमधील दुर्गंधी घालवून शकतो. या काही टिप्समुळे फ्रिज काही मिनिटात स्वच्छ होईल व त्यातून दुर्गंधी देखील पसरणार नाही. 3 / 9फ्रिजमधील कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर करू शकतो. फक्त चमचाभर चहा पावडर वापरून आपण फ्रिजमधील दुर्गंधी घालवू शकतो. चहा पावडर फ्रिजमधील कुबट दुर्गंधी शोषून घेते व त्यामुळे फ्रिजमधून घाणेरडा वास येत नाही. 4 / 9एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबसलस्पून चहा पावडर आणि बेकिंग सोडा घेऊन त्यांचे एकत्रित मिश्रण तयार करा. हे मिश्रण फ्रिजमध्ये एका कोपऱ्यात ठेवा. बेकिंग सोडा फ्रिजमधील ओलावा आणि चहा पावडर कुबट दुर्गंधी शोषून घेईल. 5 / 9चहा तयार केल्यानंतर टी - बॅग्स फेकून देण्यापेक्षा आपण त्या फ्रिजमध्ये ठेवू शकता. टी - बॅग फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधून येणारी कुबट दुर्गंधी लगेच नाहीशी होऊन फ्रिजमध्ये चहा पावडरचा सुगंध दरवळतो. 6 / 9चहा पावडर आणि कोळसा यांचे मिश्रण देखील फ्रिजमधील कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. एक बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबसलस्पून चहा पावडर आणि कोळसा बारीक करून त्याची तयार केलेली पूड घ्यावी. कोळसा केवळ फ्रिजमधील आर्द्रताच शोषून घेत नाही तर दुर्गंधी देखील शोषून घेतो. दर १५ दिवसांनी हे बाऊल मधील मिश्रण बदला. 7 / 9चहा पावडर ऐवजी आपण चहाच्या पानांचा देखील वापर करु शकता. यासाठी चहाची पाने एका मलमलच्या कापडात किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरुन ते फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे फ्रिजमधील कुबट दुर्गंधी नाहीशी होते. 8 / 9चहाची पाने कापून त्यांचे बारीक तुकडे करुन घ्यावेत. त्यानंतर हे पानांचे तुकडे एका छोट्या बाऊलमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करून घ्यावा. चहाची पाने आणि लिंबाच्या रसाचे हे मिश्रण एका बाऊलमध्ये ठेवून तो बाऊल फ्रिजमध्ये ठेवावा. लिंबाच्या रसामुळे फ्रिजमधून येणारी दुर्गंधी कमी केली जाऊ शकते. 9 / 9चहाची पाने आणि वाळलेल्या संत्र्याच्या सालीचे मिश्रण हा दुर्गंधी दूर करण्याचा आणखी एक उत्तम उपाय आहे. चहाची पाने आणि वाळलेल्या संत्र्याच्या साली एका जाळीच्या पिशवीत ठेवून मग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. संत्र्याची साल दुर्गंधी कमी करते तसेच फ्रीजमध्ये एक विशिष्ट प्रकारचा मंद सुगंध पसरवते.