हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

Updated:January 24, 2025 13:18 IST2025-01-24T13:10:35+5:302025-01-24T13:18:51+5:30

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकू कार्यक्रमाची लगबग दिसून येते. हल्ली तर खूपच उत्साहात हळदी- कुंकूची तयारी केली जात आहे. हा जणू एकप्रकारचा सोहळाच असल्यासारखी तयारी अनेकजणी मोठ्या हौशीने करतात. कामाच्या व्यापात सगळेच जण अडकून गेलेले असतात. त्यामुळे इच्छा असूनही भेटीगाठी होत नाहीत. म्हणूनच या निमित्ताने आपल्याघरी मैत्रिणींना बोलावणे, त्यांचे स्वागत, आदरातिथ्य करणे असे सगळे उत्साहात केले जाते.(6 tips for haldi kunku program)

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

घरात मदतीला बरेच हात असतील तर कोणत्याही कार्यक्रमाची तयारी अगदी झटपट होऊन जाते. पण इतर कोणी नसेल तर एकटीची मात्र फार फजिती होते आणि ऐन कार्यक्रमाच्या वेळी मग चेहऱ्यावर सगळा थकवा दिसू लागतो. असं तुमच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा..(how to do perfect planning for haldi kunku program?)

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

कोणताही कार्यक्रम म्हटलं की स्वच्छता आलीच. त्यामुळे घर आवरण्याचं काम अगदी ऐववेळी सुरू करू नका. एक- दोन दिवस आधीच थोडी साफसफाई करा. जी काही सजावट करायची आहे ती आदल्यादिवशी आधीच करून ठेवा.

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

वाणाचे साहित्य, हळदी- कुंकूसाठी लागणाऱ्या वस्तू दोन दिवस आधीच आणून ठेवा आणि त्या छान पॅक करून ठेवा. म्हणजे द्यायलाही छान वाटतात.

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

जर तुमच्याकडे मदतीला कोणी नसेल तर हळदी- कुंकूसाठी अगदी सोपा सुटसुटीत मेन्यू ठेवा. फ्रुट सलाड, मसाला दूध, फ्रुट प्लेट असं काही सोपं असेल तर ते ठेवा. कारण जर तुम्ही काही स्नॅक्स दिलं तर ते सर्व्ह करा. पुन्हा प्रत्येकीला पाणी आणून द्या यात खूप धावपळ होते. जो काही मेन्यू करणार आहात त्याचं साहित्य आधीच आणून ठेवा. सर्व्हिंग प्लेट, बाऊल एका ठिकाणी ठेवा जेणेकरून ते शोधण्यात वेळ जाणार नाही.

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

हळदीकुंकूचं ताट आधीच छान सजवून ठेवा. वाणाची वस्तू, ओटीची पिशवी, देणार असाल तर गजरे असं सगळं अगदी जवळ किंवा एका पिशवीमध्ये घालूनच ठेवा. जेणेकरून हळदी- कुंकू लावल्याबरोबर सगळ्या वस्तू एकदम दिल्या जातील आणि काही विसरणार नाही.

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

रांगोळी काढण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे आधीच काय रांगोळी काढणार याचा विचार करून ठेवा आणि अगदी दुपारी १- २ वाजताच रांगोळी काढून बाहेरची इतर सजावट करून ठेवा. रांगोळी काढायला सोपी पण दिसायला आकर्षक अशी निवडा जेणेकरून त्यात तुमचा खूप वेळ जणार नाही.

हळदी- कुंकू कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यासाठी ६ टिप्स, कामाचा ताण न येता सगळं होईल छान

तुम्ही कोणती साडी नेसणार, कोणते दागिने घालणार, मेकअपसाठी कोणकोणते साहित्य लागणार, हेअरस्टाईल कशी असणार याचा विचार आधीच करा आणि सगळे सामान आदल्या दिवशीच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काढून ठेवा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर हळदी- कुंकू कार्यक्रमाच्या दिवशी तुमची मुळीच धावपळ होणार नाही.