घरातल्या लाकडी फर्निचरची स्वच्छता करण्यासाठी ७ सोप्या टिप्स, फर्निचर दिसेल कायम नवंकोरं By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 8:43 PM 1 / 8आजकाल वेगवेगळ्या मटेरियलपासून बनविलेले फर्निचर बाजारांत उपलब्ध असतात. कितीही नव्या मटेरियलमध्ये जरी फर्निचर आले तरी लाकडाच्या फर्निचरने घराची जी शोभा दिसते त्याची सर इतर मटेरियलने येणार नाही. सुंदर आणि नीटनेटके फर्निचर घराच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळे बहुतांश लोकांना आपल्या घरात सुंदर लाकडी फर्निचर असावे असे वाटते. हे डिझायनर फर्निचर जितके सुंदर दिसते तितकेच त्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. या लाकडी फर्निचरची काळजी न घेतल्यास ते खराब होऊ लागते. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रोज घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे लाकडी फर्निचरही रोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून आपण आपले फ़र्निचर स्वच्छ ठेवू शकतो. लाकडी फर्निचरची योग्य ती काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स समजून घेऊयात(7 Simple Tips To Clean Wooden Furniture At Home). 2 / 8जर लाकडी फर्निचरला काही डाग लागले असतील. हे हट्टी डाग अनेकदा पुसून जात नसतील तर एक सोपा उपाय करा. एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या. या गरम पाण्यात एक कॉटनचा कपडा बुडवून घ्या. या ओल्या फडक्याने हे डाग पुसून घ्या. गरम पाण्यामुळे हे हट्टी डाग लवकर निघण्यात मदत होईल. 3 / 8सगळ्यांत हट्टी डाग घालविण्यासाठी डिटर्जन्ट हा एक उत्तम पर्याय आहे. पाण्यात डिटर्जंट घालून ते व्यवस्थित विरघळवून घ्या. हे मिश्रण लाकडी फर्निचरवरील डागांवर लावा आणि कापडाच्या साहाय्याने पुसून घ्या. या मिश्रणाने लाकडी फर्निचरवरचे हट्टी डाग आपण सहज काढू शकतो. 4 / 8डिटर्जंटप्रमाणेच आपण या हट्टी डागांसाठी बेकिंग सोडा वापरू शकतो. पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून ते व्यावस्थित एकजीव करून घ्या. हे मिश्रण डागांवर ओता मग टिश्यू पेपर किंवा कापडाने स्वच्छ पुसून घ्या. 5 / 8हट्टी डागांना सहज काढण्यासाठी व्हिनेगर देखील वापरू शकता. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात २ चमचे व्हिनेगर घालून त्याचे एकत्रित मिश्रण तयार करा. व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणाने लाकडी फर्निचरवरील डाग सहज निघतात. 6 / 8लाकडी फर्निचरची स्वच्छता करण्यासाठी आपण घरगुती वस्तूंचा वापर करू शकतो. पण त्याचबरोबर बाजारात लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅंड्सचे वूडन क्लिनिंग सोल्युशनस येतात. या क्लिनिंग सोल्युशनचा वापर करून आपण लाकडी फर्निचर वेळोवेळी स्वच्छ ठेवू शकतो. 7 / 8स्क्वीझ बॉटल किंवा स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण लाकडी फर्निचरवर स्प्रे करून कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्या. या होममेड स्प्रेमुळे अगदी कमी वेळात आपले लाकडी फर्निचर स्वच्छ होऊ शकते. रोजच्या रोज लाकडी फर्निचर साफ करण्यासाठी होममेड स्प्रे वापरू शकता. 8 / 8फर्निचरमध्ये वाळवीची पैदास होण्यासाठी ओल आणि आर्द्रता पोषक ठरते. त्यामुळे किमान ६ महिन्यातून एकदा वाळवीरोधक सोल्युशनने फर्निचरला वाळवीरोधक बनवणे उपयोगी ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications