Join us   

किचनमधील काचेची भांडी फुटू नयेत म्हणून खास ७ टिप्स, क्रॉकरी टिकेल भरपूर दिवस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 7:26 PM

1 / 8
किचनमध्ये आपण वेगवेगळ्या मटेरियल पासून तयार झालेल्या भांड्यांचा वापर करतो. या सगळ्यांत काचेची भांडी ही खूपच नाजूक असतात. आपण रोजच्या वापरात काचेच्या भांड्यांचा वापर कमी किंवा कधीतरीच करतो, त्यामुळे या भांड्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. किचनमध्ये काचेचे बाऊल, चमचे, बाटल्या, कप, मग अशी अनेक भांडी असतात. ही काचेची भांडी अनेकदा हाताळताना पडून फुटतात किंवा त्यांना तडे जातात. यासाठीच आपल्या किचनमधील काचेची भांडी पडून फुटू नयेत म्हणून त्यांची काळजी कशी घ्यावी, ते पाहूयात(How to Minimize Breakage for Your Glassware).
2 / 8
१. काचेचे कप, ग्लास, मग धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी आपण शक्यतो ते किचनच्या ओट्यावरच ठेवतो. असे न करता ते एका लाकडी बास्केट किंवा टोपलीत वाळवण्यासाठी ठेवावेत. जेणेकरून त्यांना चुकून हात लागून ते पडणार नाहीत.
3 / 8
२. काचेची भांडी स्वच्छ करताना ती कधीही तारेच्या घासणीने घासू नका, त्यामुळे भांड्यावर चरे पडण्याची शक्यता असते. काचेची भांडी नेहमीच लिक्विड सोपने आणि स्पंजने घासावीत.
4 / 8
३. काचेची भांडी रोजच्या वापरातल्या सगळ्या भांड्यांबरोबर ठेवू नका, ती वेगळी एकत्र ठेवावी. काचेची भांडी शक्यतो किचन कॅबिनेटच्या ड्रॉवरमध्ये स्टोअर करून ठेवावीत. यामुळे भांडी फुटण्याचा धोका कमी होतो.
5 / 8
४. काचेची भांडी धुऊन वाळवताना, ती एखाद्या कापडावर वाळत घालावी, म्हणजे ती फुटण्याची शक्यता कमी होते.
6 / 8
५. काच किंवा सिरॅमिकचे कप सुरक्षित ठेवण्यासाठी किचनमध्ये एका भिंतीवर हुक लावून त्यात हे कप लटकवून ठेवावेत. कप धुतल्यानंतर त्यांना हुकवर लटकवून ठेवावे यामुळे कपातील पाणीही निघून जाईल आणि ते फुटण्याची भीतीही राहणार नाही.
7 / 8
६. काचेचे ग्लास ,कप ठेवण्यासाठी कप स्टँडचा देखील वापर करु शकता. कप स्टँडच्या हुकमध्ये तुम्ही कप सहजपणे लटकवू शकता. स्टील आणि लोखंडी डिझाइन्स असलेले अनेक कप स्टँड बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होतात.
8 / 8
७. काचेची भांडी किचनच्या एकदम वरच्या केबिनेट मध्ये स्टोअर करु नका. कारण ही भांडी केबिनेटमधून काढताना हातातून पडून फुटण्याची शक्यता असते. यासाठी काचेची भांडी नेहमी तळाशी आणि सहजसोप्या पद्धतीने काढता येतील अशी ठेवावीत.
टॅग्स : सोशल व्हायरलकिचन टिप्स