घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

Updated:February 12, 2025 13:12 IST2025-02-12T13:03:39+5:302025-02-12T13:12:36+5:30

7 tips for home organization .. house will look clean and beautiful : घर स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करा.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

घर स्वच्छ आणि सुंदरच असायला हवं. घर स्वच्छ असलं की वातावरण प्रसन्न राहते.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

पण बरेचदा कामाच्या गडबडीमुळे घरात पसारा होतो. तो पसारा आवरायला वेळ मिळत नाही आणि वेळ मिळेपर्यंत पसारा एवढा वाढतो की, आवरताना नाकी नऊ येतात.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

काही सोप्या टिप्स आहेत. ज्या तुम्हालाही माहिती असतील. पण कोणाकडून तरी रिमाईंडर हवा आहे. तर या टिप्स वाचा.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

१.घाईत डबा तयार केला की, मागची आवरा-आवरी राहून जाते. मग संध्याकाळी परत येऊन आवरण्याची ताकदही नसते. आणि स्वयंपाक घरामध्ये वासही सुटतो. सकाळची ही घाई टाळण्यासाठी डब्यासाठीची पूर्व तयारी रात्रीच करून ठेवा. चिरलेली भाजी फ्रिजमध्ये खराब होत नाही. भाजी चिरून पाणी शिंपडून ठेवून द्यायची. सकाळी फक्त फोडणीला टाकली की काम झालं.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

२.आपण बाहेरून काही आणले की, त्याचे डबे साठवून ठेवतो. त्यामुळे स्वयंपाक घर फार भरलेले दिसते. ते डबे रिसायकल करण्यासाठी कार्यरत असणार्‍या कंपन्यांना द्या. घरात प्लास्टिकचे डबे वापरे आरोग्यासाठीही चांगले नाही. घरात सामान जेवढं कमी तेवढं घर स्वच्छ आणि सुंदर दिसतं.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

३.घराला जेवढे पण दरवाजे आहेत, त्या प्रत्येक दरवाज्यापाशी पाय पुसणं ठेवा. यामुळे फरशी स्वच्छ राहण्यासाठी फार मदत होते. तसेच खुर्च्यांचे पाय खालून खराब होतात. ते साफ करण्याकडे आपण लक्ष देत नाही. पण ते धुणे गरजेचे असते.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

४. आपल्या घरी शु-रॅक असतो. पण तरी आपण त्याचा वापर करत नाही. चपला बाहेरच ठेवतो. त्यापेक्षा शु-रॅकचा वापर करा. त्यात जास्तीचा खण असेल तर, त्यातही काही सामान ठेवू शकता.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

५. आपण घराची जमिन साफ ठेवतो. पण भिंतींकडे लक्ष देत नाही. घराच्या भिंतींवरही सुखा फडका फिरवावा. घर स्वच्छ दिसेल. भिंती स्वच्छ ठेवणेही गरजेचे असते. कारण त्यावर धूळ बसलेली असते.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

६. घरातल्या लोकांमध्ये कामे वाटून घ्या. एकावरती भार असल्यास कामं पटापट करण्याच्या नादात व्यवस्थित होत नाहीत. घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या घरात राहणार्‍या प्रत्येकाची आहे.

घरातला पसारा झ्टपट कमी करायचाय? ७ टिप्स, घर कायम दिसेल आवरलेलं - पसारा गायब

७. लहान-लहान खण असलेल्या बॅग्ज विकत मिळतात. त्या वापरा. त्या जागाही कमी व्यापतात. तसेच सगळं सामान वेल-ऑर्गनायझ ठेवता येतं.