Diwali : यंदा एकदम हटके आकाशकंदिल शोधताय? पाहा हे ७ नवे कंदिल- साऱ्या गल्लीत तुमचा कंदिल दिसेल उठून! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 3:39 PM 1 / 10दिन दिन दिवाळी (Diwali 2024). आता काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे (Diwali Akash Kandil). दिवाळी म्हटलं की, सर्वत्र रोषणाई, आणि आकाशावर फटाक्यांची आतिषबाजी (Kandil Design). दिवाळी सणाला भारतात विशेष महत्व आहे. दिवाळी जवळ आली की, दाराबाहेर किंवा खिडकीमध्ये कंदील लावण्यात येते(7 Unique Akash Kandil For Diwali).2 / 10सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे कंदील (Kandil) उपलब्ध आहेत. फॅशनेबल झमगणारे आकर्षक कंदील डोळ्यांसाठी सुखदायक ठरतात. काही लोक एकाच प्रकारचे कंदील दरवर्षी लावतात. तर काही जण विविध प्रकारचे कंदील ट्राय करतात. 3 / 10जर आपल्याला एकाच प्रकारचे कंदील लावायचे नसतील तर, या ७ प्रकारचे कंदीलही घरात ट्राय करून पाहा. आपल्याला ७ पैकी १ पर्याय तरी नक्कीच आवडेल. 4 / 10प्लास्टिक वगळता पेपरचे कंदील सध्या ट्रेण्डिंग आहे. आपण षटकोन आकाराचे हे पारंपारिक डिझाईनचे कंदील नक्कीच यंदाच्या दिवाळीला ट्राय करू शकता. 5 / 10सध्या कापडी कंदीलचीही मार्केटमध्ये मागणी आहे. यात विविध प्रकारचे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात. 6 / 10बलून आकाराचा कंदील फार पूर्वीपासून ट्रेण्डमध्ये आहे. आकर्षक रंगांमुळे बलून कंदील फार सुंदर दिसतात. 7 / 10सिंपल इको फ्रेंडली कंदील बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतात. आपण या कंदीलचा वापर बरीच वर्ष करू शकता. 8 / 10स्टार कंदीलमुळे आपली बाल्कनी आकर्षक दिसते. त्याचा उजेड संपूर्ण घरामध्ये पसरतो. 9 / 10काही जण घरीच टाकाऊपासून कंदील तयार करतात. आपण आपल्या आयडिया लावून कंदील तयार करू शकता. 10 / 10मार्केटमध्ये सध्या साड्यांच्या कापडांच्या आकाश कंदीलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैठणीच्या कापडाचे कंदील दिवसाही सुंदर दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications