Rose Day: प्रेमानं गुलाब देताना गुलाबाच्या पाकळ्यांचे हे पदार्थही खा, वाढेल प्रेमाची गुलाबी रंगत! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2024 3:53 PM 1 / 7व्हॅलेंटाईन डे (valentines day) जवळ येत आहे. व्हॅलेंटाईन वीकमधला (valentines week) एक दिवस म्हणजे रोज डे (rose day)... आजच्या दिवशी तुमच्या व्हॅलेंटाईनला एक छानसं गुलाबाचं फूल तर द्याच, पण त्यासोबतच गुलाबापासून तयार झालेले हे काही छानसे चवदार पदार्थही खाऊ घाला. दोघं मिळून या पदार्थांचा आनंद घ्या...2 / 7रोज मिल्क शेक हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. रोज डे निमित्त या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता..3 / 7रोज मिल्क शेक आवडत नसेल तर तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत छानसं गुलाबाचं सरबत प्या... बघा कसा रोमँटिक माहोल तयार होईल...4 / 7गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारं गुलकंद आईस्क्रिम किंवा गुलकंद कुल्फीचाही आनंद एकमेकांसोबत घेऊन पाहा..5 / 7गुलकंद बर्फी हा प्रकारही सध्या बराच लोकप्रिय असून तुमच्या शहरातल्या नामांकित मिठाईच्या दुकानात तो नक्कीच मिळेल.6 / 7आजच्या रोज डे च्या निमित्ताने तुम्ही गुलकंद फ्लेवरचा केक कापून तुमचा रोज डे आणखी स्पेशल बनवू शकता.7 / 7रोज जॅम हा पदार्थही हल्ली अनेकांना आवडतो. रोज डे ला तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही गुलाबाचं फूल तर द्याच, पण हा रोज जॅमही गिफ्ट म्हणून देऊ शकता. किंवा रोज डे च्या संध्याकाळी तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत ब्रेड बटर विथ रोज जॅम असा भन्नाट पदार्थ खाऊन सेलिब्रेशन करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications