फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

Published:October 23, 2024 12:10 PM2024-10-23T12:10:30+5:302024-10-23T12:21:07+5:30

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

दिवाळीसाठी (Diwali 2024) तुमचं घर स्वच्छ, चकाचक करण्याचं काम सुरू असेल तर ते काम अधिक सोपं आणि झटपट करण्यासाठी व्हिनेगरची मदत कशी घ्यायची ते पाहा.. (8 amazing benefits of using vinegar for cleaning home)

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

फरशांच्या कोपऱ्यांमध्ये बऱ्याचदा माती अडकलेली असते. त्यामुळे काेपरे थोडे काळवंडून जातात. ते स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी व्हिनेगर लावा आणि काही मिनिटांनी ओल्या कपड्याने पुसून घ्या. फरशी चकाचक होईल.(diwali home cleaning tips using vinegar)

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

फरशी पुसण्याच्या पाण्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा थोडं व्हिनेगर आणि थोडं मीठ टाका. यामुळे घरात मुंग्या, चिलटं होणार नाहीत.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

आरसे स्वच्छ करण्यासाठी एका सुती कपड्यावर थोडेसे व्हिनेगर घ्या आणि ते आरशावर चोळा. त्यानंतर एका स्वच्छ, कोरड्या, सुती ओलसर कपड्याने आरसा पुसून घ्या.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

किचन ओटा किंवा ओट्याजवळच्या खिडक्या, गॅस शेगडी यांना आलेला चिकटपणा काढण्यासाठीही व्हिनेगरचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी एका स्प्रे बाॅटलमध्ये पाऊण वाटी व्हिनेगर आणि पाव वाटी पाणी घ्या. ते व्यवस्थित एकत्र करून चिकट झालेल्या ओट्यावर शिंपडा आणि नंतर सुती कपड्याने पुसून घ्या.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

नळावर जर पाण्याचे पांढरट डाग पडले असतील तर त्यासाठीही वर सांगितल्याप्रमाणे तयार केलेले सोल्यूशन वापरा. नळ चकाचक होतील.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

सिंक पांढरट पडलं असेल, त्यावरचे डाग निघत नसतील तर व्हिनेगर लावून ते एकदा घासून काढा. डाग निघून जातील.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

फर्निचरवर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी थोडे व्हिनेगर लावा. पण ते थेट न लावता आणि एका कपड्यावर घ्या आणि मग त्या कपड्याने फर्निचर पुसून काढा.

फक्त ६० रुपयांचं व्हिनेगर चमकवेल तुमचं घर! बघा दिवाळीत स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ८ अफलातून उपयोग...

लेदरचा सोफ स्वच्छ करण्यासाठी पाणी आणि व्हिनेगर यांचं मिश्रण उपयुक्त ठरतं. घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचा उपयोग करण्याची ही माहिती झटपट मराठी टिप्स या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.