पावसाळ्यात फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या सडून खराब होऊ नये म्हणून ६ उपयुक्त ट्रिक्स... Published:July 1, 2024 08:14 PM 2024-07-01T20:14:04+5:30 2024-07-01T20:39:13+5:30
8 Tips To Preserve Vegetables During The Monsoon : Monsoon Vegetable Hacks: How To Buy And Store Them Properly To Prevent Them From Getting Spoiled : भाज्या कितीही व्यवस्थित स्टोर केल्या तरीही त्या पावसाळ्यात सडून जातात असे होऊ नये म्हणून करा साधेसोपे उपाय... पावसाळ्यात भाज्या व फळे खराब होण्याचं प्रमाण अधिक असते. या ऋतूत आपण भाज्या - फळे कितीही व्यवस्थित स्टोअर करुन फ्रिजमध्ये ठेवली तरीही ती सडून खराब होतातच. इजतर पावसाळ्यात भाज्या - फळं खूप महाग मिळतात, अशातच ते नीटनेटक्या पद्धतीने स्टोअर करुन ठेवले नाही तर लगेच खराब होतात. पावसाळ्यात अन्नपदार्थ किंवा फळे, भाजीपाला खराब होऊन वाया जाऊ नये यासाठी अनेक गृहिणी प्रयत्न करत असतात. पावसाळ्यात वातावरणात जास्तीचा ओलावा असल्याने पदार्थात बॅक्टेरिया वाढवण्यासाठी हे पोषक वातावरण असते. याकाळात भाजीपाला - फळे बऱ्याचदा लवकर खराब होतात. तेव्हा पावसाळ्यात फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवलेल्या भाज्या - फळे खराब होऊ नयेत यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(8 tips to prevent vegetables spoiling during the monsoon).
कोथिंबीर व पुदिना स्टोअर करताना सगळ्यांत आधी ते निवडून त्यांची पानं वेगळी करावीत. नीट ज्या डब्यांत आपण हे स्टोअर करुन ठेवणार त्या डब्याच्या तळाशी १ ते २ टिश्यू पेपर अंथरा. त्यावर निवडून घेतलेली कोथिंबीर पुदिन्याची पान ठेवा आणि मग त्यावर अजून एक टिश्यू पेपर ठेवून व्यवस्थित झाकून घ्या. यामुळे कोथिंबीर व पुदिना लवकर खराब होणार नाही(Easy Tricks To Keep Vegetables Fresh During Monsoon Season)
कांदे व बटाटे विकत घेताना शक्यतो ओले असतील तर घेऊ नयेत. कांदे, बटाटे प्लॉस्टिकच्या पिशवीत न ठेवता ते दोन्ही वेगवेगळे एका हवेशीर बास्केटमध्ये काढून ठेवा. कांदे, बटाटे स्टोअर करताना त्यांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही अशा कोरड्या जागी स्टोअर करून ठेवा.
हिरव्या मिरच्या स्टोअर करताना त्यांचे देट काढून त्या एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवाव्यात. मिरच्या शक्यतो काचेच्या किंवा स्टिलच्या डब्यांत स्टोअर करुन ठेवाव्यात.
फ्लॉवरच्या तळाशी असणारा देटाकडचा भाग कापून तो कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवावा. यामुळे तो खराब न होता दीर्घकाळ चांगला राहतो.
पावसाळ्यात भाज्या स्टोअर करण्यासाठी डब्यांऐवजी कॉटनच्या कापडाचा वापर करावा. या उपायामुळे भाज्यांमधील जास्तीची आर्द्रता कॉटनच्या कापडात शोषली जाऊन भाज्या दीर्घकाळासाठी चांगल्या राहतात.
ज्या भाज्या लवकर खराब होतात जसे की दुधी, भेंडी या भाज्या लवकर खाऊन संपवा. याउलट ज्या भाज्या लवकर खराब न होता जास्त काळ टिकतात जसे कि, गाजर, कारली त्या नंतर खाव्यात.
पावसाळ्यात एकदम एकावेळी सगळ्या भाज्या फळे विकत आणून स्टोअर करू नका. शक्यतो नेहमी फ्रेश भाजी आणि फळ खरेदी करा. जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही.
पावसाळ्यात नियमितपणे फ्रिजची साफसफाई करा. फ्रिज जर साफ नसेल तर त्यात ठेवलेले पदार्थ लवकर खराब होऊ शकतात.