Join us

चमचाभर मिठाने होतील घरातील 'ही' ८ कामं पटापट, चिमूटभर मिठाची ही पाहा जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 18:30 IST

1 / 9
कोणत्याही अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण त्यात (8 smart ways to use salt beyond cooking) मीठ घालतो. मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव येत नाही. असे असले तरीही मिठाचा वापर फक्त स्वयंपाक (How to Use Salt for Cleaning) घरातच नाही तर घरातील इतर कामांसाठी देखील केला जातो. स्वयंपाक घरात दररोज वापरल्या जाणाऱ्या मिठाचा वापर करून तुम्ही घरातील कोणकोणती काम करू शकता, ते पाहा.
2 / 9
चहा - कॉफी पिताना जर कपड्यांवर सांडला तर त्याचे हट्टी डाग निघत नाहीत. अशावेळी आपण मिठाचा वापर करु शकतो. एका कपात बर्फ व थोडे पाणी घालूंन मग त्यात ४ टेबलस्पून मीठ घालावे. हे तयार द्रावण थेट डागांवर ओतून हलकेच कपडे घासून घ्यावेत. मग डिटर्जंटने कपडे पुन्हा एकदा धुवून घ्यावेत. चहा - कॉफीचे डाग सहजपणे निघून जातील.
3 / 9
मिठाचा वापर करून आपण किचनमधील भांडी स्वच्छ करु शकतो. गॅस शेगडी, फ्रिज, ओव्हन,मायक्रोव्हेव यांसारखी किचनमध्ये वापरली जाणारी उपकरणं आपण मिठाने स्वच्छ करु शकतो. यासाठी एका भांडयात पाणी घेऊन त्यात चमचाभर मीठ घालावे. या तयार द्रावणाने सगळी उपकरणं स्वच्छ पुसून घ्यावीत.
4 / 9
घरातील पितळेची भांडी आणि देवघरातील पितळेच्या मुर्त्या स्वच्छ करण्यासाठी आपण मिठाचा वापर करु शकतो. मीठ वापरून आपण पितळेची भांडी किंवा मुर्त्या अगदी नव्यासारख्या स्वच्छ करु शकतो. प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, गव्हाचे पीठ आणि व्हिनेगर घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पितळेच्या भांड्यांवर लावून भांडी घासल्याने ती स्वच्छ होतात.
5 / 9
जर त्वचेला सारखी खाज येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात एक चमचाभर मीठ घालावे. मिठाने त्वचेचे स्क्रबिंग केल्याने डेड स्किन काढून टाकण्यास मदत मिळते. त्वचेचे ब्लड सर्क्युलेशन करुन त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यास मदत होते. पायाला सूज आल्यावर मिठाच्या पाण्यांत पाय घालून बसावे, यामुळे सूज कमी होते.
6 / 9
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी मीठ फारच उपयोगी ठरु शकते. आठवड्यातून एकदा जाड्या समुद्री मिठाने दात घासल्याने दातांवरील साचलेला पिवळा थर नाहीसा होण्यास अधिक मदत मिळते.
7 / 9
बुटांना येणारा घाणेरडा वास मिठाच्या मदतीनं काढता येऊ शकतो. हा हॅक कापड किंवा कॅनव्हास शूजवर काम करेल. यासाठी शूजच्या आत थोडे मीठ शिंपडा. मीठाने शूजचा वास कमी होईल. नंतर पुन्हा ओल्या कापडाने पुसून टाकू शकता. असे केल्याने शूजचा वास दूर होईल, परंतु येथे हे देखील लक्षात ठेवा की मीठ जास्त वेळ बुटांवर ठेवू नयेत.
8 / 9
घराच्या कानाकोपऱ्यात बऱ्याचवेळा फार मुंग्या असतात. या मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आपण मिठाचा वापर करु शकतो. ज्या भागात मुंग्या दिसतील त्या भागात थोडे जाडे मीठ शिंपडावे, यामुळे मुंग्यांचे प्रमाण कमी होते.
9 / 9
आपण मीठ वापरून लाकडी फर्निचरवरील पाण्याचे डाग देखील काढू शकता. यासाठी 1 चमचा मीठामध्ये पाण्याचे काही थेंब घाला आणि ते फक्त काही थेंब असले पाहिजे कारण मीठ खूप लवकर विरघळेल. यानंतर कापडात पेस्टसारखे मीठ लावून फर्निचर पुसून टाका. हे लक्षात ठेवा की ते हलक्या हातांनी केले पाहिजे जेणेकरून फर्निचरची पॉलिश खराब होणार नाही.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनकिचन टिप्स