एक लिंबू झेलू बाई, करु कामं पटपट! एका लिंबाने होते स्वयंपाकघरातली किचकट स्वच्छता झटपट... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2024 10:00 AM 1 / 10आपल्या किचनमध्ये काही पदार्थ हे नेहमी असतातच त्यापैकीच एक लिंबू. सगळ्यांच्या किचनमध्ये नेहमी असणारे हे लिंबू खूप उपयोगी आहेत. पदार्थांची चव वाढवण्याबरोबरच ते किचनच्या स्वच्छतेपर्यंत हा इवलासा लिंबू अतिशय फायदेशीर ठरतो. या इवल्याशा लिंबाचा वापर करुन आपण घरातील तसेच किचनमधील असंख्य कामे करु शकतो(Genius Ways to Use Lemon Peels Around the House).2 / 10१. सफरचंद कापल्यानंतर ते काळे पडते. अशावेळी या सफरचंदाचा रंग आहे तसाच ठेवण्यासाठी आपण त्यावर लिंबाचा रस पिळून लावल्याने सफरचंद काळे पडत नाही. 3 / 10२. मायक्रोव्हेव आतून स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाचा वापर करु शकतो यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबू कापून ठेवावा. हा बाऊल मायक्रोव्हेव मध्ये ३ मिनिटांसाठी नॉर्मल टेम्परेचरला ठेवून द्यावा. त्यानंतर किमान ५ मिनिटे हा बाऊल तसाच आत ठेवावा. यामुळे मायक्रोव्हेव आतून स्वच्छ केला जातो. 4 / 10३. एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. उकळलेल्या पाण्यांत लिंबाच्या साली, लवंग, दालचिनी घालून ५ मिनिटे त्या पाण्याला उकळी येऊ द्यावी. त्यानंतर गाळून हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन घ्यावे. घरात केमिकल्सयुक्त एअर फ्रेशनर्स वापरण्यापेक्षा या पाण्याचा आपण एअर फ्रेशनर्स म्हणून वापर करु शकतो. 5 / 10४. जर आपल्या चॉपिंग बोर्डला कांद्याचा उग्र वास येत असेल किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यांत कांदा चिरुन ठेवला असेल तर अशा वस्तूंवरील कांद्याचा वास घालवण्यासाठी लिंबाच्या फोडीने चॉपिंग बोर्ड आणि प्लॅस्टिकचा डबा घासून घ्यावा. यामुळे कांद्याचा उग्र वास निघून जाण्यास मदत मिळते. 6 / 10५. लसूण सोलल्यानंतर आपल्या हाताला लसणाचा उग्र वास येतो. कितीही वेळा साबणाने हात धुतले तरीही हा उग्र वास जाता जात नाही. अशावेळी लिंबाचा रस आपल्या हातांवर चोळून मग स्वच्छ हात धुवून घ्यावेत. यामुळे लसणाचा उग्र वास चटकन नाहीसा होतो. 7 / 10६. जर आपल्या फ्रिजमध्ये कुबट दुर्गंधी येत असेल तर अशी दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी एका बाऊलमध्ये कापूस व्यवस्थित पसरवून ठेवावा. त्यानंतर त्या कापसावर लिंबाचा रस ओतून तो बाऊल फ्रिजमध्ये एका कोपऱ्यात ठेवून द्यावा. यामुळे फ्रिजमधून येणारी कुबट दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळते. 8 / 10७. बेसिन किंवा बाथरूममधील नळांवर काहीवेळा पांढरे डाग येतात. हे पांढरे डाग काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस आणि लिंबाची साल या डागांवर घासून घ्यावी. यामुळे नळांवरील हे पांढरे डाग कमी होतात. 9 / 10८. अरबी आणि भेंडी यांसारख्या भाज्या केल्यावर त्यातील चिकटपणामुळे त्या शक्यतो बुळबुळीत, चिकट होतात. अशा भाज्यांचा चिकटपणा कमी करण्यासाठी आपण त्यात लिंबाचा रस घालू शकतो. 10 / 10९. कपभर व्हिनेगरमध्ये २ टेबलस्पून लिंबाचा रस घालून द्रावण तयार करुन घ्यावे. बाजारातून आणलेली फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी आपण हे द्रावण त्यांच्यावर स्प्रे करु शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications