Priyanka Chopra Birthday: प्रियांका चोप्राचा 'हा' संघर्ष कुणीच पाहिला नाही, त्यामुळेच तर ती आज.....
Updated:July 18, 2024 12:50 IST2024-07-18T12:43:09+5:302024-07-18T12:50:06+5:30

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस. ४१ वर्षांची असलेली ही अभिनेत्री आज बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडवरही राज्य करते आहे...पद्मश्री पुरस्कार, दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणारी प्रियांका आज लेक मालती आणि नवरा निक जोनास यांच्यासोबत तिचा वाढदिवस साजरा करते आहे.
आज प्रियांकाने स्वत:ची जी ओळख निर्माण केली आहे, ती तिला तेवढी सहजासहजी मिळालेली नाही. कोणत्याही गॉडफादरशिवाय ती बॉलीवूडमध्ये आली आणि भक्कमपणे उभी राहिली. आज तिचा आत्मविश्वास हा तिचा एक प्लस पॉईंट असला तरी लहानपणी नेमका तोच तिच्यामध्ये नव्हता.
कारण तिच्या आसपासच्या लोकांनीच तिला रंगावरून हिणवून तो पुर्णपणे घालवून टाकला होता. याविषयी काही दिवसांपुर्वी एका खाजगी वाहिनीला दिलेल्य मुलाखतील बोलताना प्रियांका चोप्राच्या आई मधू चोप्रा म्हणाल्या होत्या की ती अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वत:ला सुंदर मानत नव्हती.
एवढंच नाही तर 'मिस इंडिया' झाल्यानंतरही तिला आपण खरोखरच सुंदर आहोत यावर विश्वास नव्हता. कारण चोप्रा परिवारात सगळे जण एकदम गोरेपान आहेत. प्रियांकाचे बाबा मात्र गव्हाळ रंगाचे होते. रंगाच्या बाबतीत प्रियांका तिच्या बाबांवर गेली. त्यामुळे लहानपणापासून तिला तिच्या रंगाबाबत अनेक टोमणे ऐकावे लागायचे.
येता जाता तिला तिच्या रंगामुळे हिणवणारे अनेक नातलग तिच्या आसपास होते. त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स जायचा. पण हळूहळू तिने स्वत:मध्ये खूप बदल केले. त्या टोमण्यांचा उपयोग तिने स्वत:ला उत्तमपणे घडविण्यासाठी केला. त्यामुळेच तर जे नातेवाईक तिला लहानपणी टाेमणे मारायचे, त्यांना ती आता ठणकावून सांगतेय की आज मी जी कोणी आहे ती केवळ तुम्ही मारलेल्या टोमण्यांमुळेच...
प्रियांका म्हणते की तुम्हाला जर कॉन्फिडन्ट वाटत नसेल तर आधी आहे त्या परिस्थितीत स्वत:ला कम्फर्टेबल करून घ्या. स्वत:ला कम्फर्टेबल करून घेतलं की आपोआप धीर मिळतो आणि कॉन्फिडन्स येतो.. कधी आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटलाच तर प्रियांकाची ही ट्रिक वापरून पाहा..