अदिती राव हैदरीने केलं दुसरं लग्न; सोनेरी रंगाच्या लेहेंगा घालून दिसत होती अप्सरा; पाहा देखणे रूप.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 1:08 PM 1 / 10'हिरामंडी' फेम बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थ (Siddharth) हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी नुकतेच लग्नातले फोटो सोशल मीडियात शेअर करून दुजोरा दिला (Beautiful Sabyasachi Lehenga). या लग्नाला त्यांनी फारश्या मंडळींना बोलवलं नाही. घरच्या सदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न उरकलं. या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी येथील ४०० वर्षे जुन्या मंदिरात विवाहसोहळा आयोजित केला होता(Aditi Rao Hydari Exudes Old World Charm In Beige Sabyasachi Lehenga, Dons Half-Moon Alta At Wedding).2 / 10या लग्नाला घरचे सदस्य आणि काही मित्र मंडळी उपस्थितीत होते. सोमवारी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी हे जोडपे कायमचे एक झाले असून, दोघेही शेअर केलेल्या फोटोंमध्ये फार आनंदित दिसत आहेत. 3 / 10अभिनेत्रीने फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिलं आहे. 'तू माझा सूर्य आहेस, चंद्र आहेस आणि माझ्यासाठी तूच माझा तारा आहेस. लव्ह, लाइट अँड मॅजिक…मिस्टर अँड मिसेस अदु-सिद्धु'.4 / 10 अभिनेत्रीच्या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांसह कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण सर्वांच्या नजरा तिच्या लेहेंग्याकडे खिळल्या. सोनेरी रंगाच्या सब्यसाची लेहेंग्यामध्ये अदिती सोनपरी दिसत होती. 5 / 10अदितीने लग्नात साधा सिंपल लूक ठेवला होता. पारंपारिक लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला. 6 / 10सोनेरी रंगाचा लेहेंगा, केसांची साधी वेणी, त्यावर गजरा आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये अदिती अप्सराहून सुंदर आणि मोहक दिसत आहे. 7 / 10या लग्नाची कल्पना तशी कोणालाच नव्हती. दरम्यान, अदिती-सिद्धार्थने २७ मार्च रोजी साखरपुडा केला होता. लग्नाप्रमाणे या दोघांनी साखरपुडा देखील गुपचूप उरकला होता.8 / 10ते दोघेही एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखत आहेत. ‘महासमुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. 9 / 10या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये आले. २०२१ पासून त्यांनी आपल्या नात्यावर कुठेही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. 10 / 10परंतु आता लग्नाचे फोटो सोशल मीडियात शेअर करून त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. आणखी वाचा Subscribe to Notifications