Join us   

Afghanistan taliban : '...आम्हाला आज रात्री जेवायलाही मिळणार नाही!' तालिबान्यांपुढे हलबल उपाशी अफगाणी मुलींची बेहाल जिंदगी..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 12:48 PM

1 / 10
अफगाणिस्तानात पाचव्या शतकात डोंगरांमध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचे हे खोरे आहे. फार पूर्वीपासून त्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. पण आता तालिबानने बामियान खोऱ्यावर विजय मिळवल्यापासून, डोंगराळ लेण्यांमध्ये राहणारे ग्रामीण अफगाणी लोक उपासमारीने आणि भीतीने खूप मानसिक, शारीरिरदृष्या कमकुवत झाले आहेत. (Image Credit- dawn.com)
2 / 10
हा समुदाय देशातील सर्वात गरीब लोकांमध्ये मोडतो आणि ऑगस्टमध्ये तालिबानच्या ताब्याने त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मदत बंद झाल्यामुळे, अन्नाच्या किंमती वाढल्या असून बेरोजगारी वाढली आहे. (Image Credit- dawn.com)
3 / 10
तेथिल रहिवासी महिला फातिमा म्हणाल्या की, ''दीड वर्षांपूर्वी मुसळधार पावसात एक गुहा अंशतः कोसळली, ज्यामुळे एक 55 वर्षीय सदस्यासह कुटुंबातील तीन सदस्य फक्त सहा चौरस मीटर आकाराच्या एका छोट्या गुहेत अडकले. घरात काहीच नसल्यानं आम्ही आज रात्री जेवणार नाही आणि हिवाळा जवळ आला आहे. आमच्याकडे स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी काहीच नाही, फक्त चेहरा काळ्या बुरख्याने झाकलेला आहे.'' (Image Credit- dawn.com)
4 / 10
42 वर्षीय वीटकाम करणारा महराम म्हणाला, ''मी रोज सकाळी बामियान बाजारात जातो, पण मी काहीही न घेता परत येतो. जेव्हा माझ्याकडे काम होते, तेव्हा मी दररोज 300 अफगाणी ($ 3.75) कमवायचो.'' (Image Credit- dawn.com)
5 / 10
आता हे कुटुंब बटाटा कापणीसाठी मुलांना पाठवून उदरनिर्वाह करत आहे. शेतकरी त्यांना पगाराऐवजी काही खायला देतात, महराम म्हणतात. 'आमच्याकडे एवढेच आहे, पण 10 दिवसात, कापणी संपेल आणि उपासमारीनं लोक मरतील.'' (Image Credit- dawn.com)
6 / 10
या प्रदेशात राहणाऱ्या बहुतांश लोकांप्रमाणेच, ही कुटुंबे हजारा आहेत, प्रामुख्याने शिया वांशिक अल्पसंख्याक आहेत ज्यांना शतकांपासून अफगाणिस्तानात छळले गेले. .'' (Image Credit- dawn.com)
7 / 10
''तालिबानचा विजय, सुन्नी कट्टरपंथीयांनी बनलेला आहे. ते या समुदायाला विद्वेषी म्हणून पाहतात. यामुळे दहशत निर्माण झाली आहे. हे खूप भयानक आहे. दरवाजाजवळ बटाट्याच्या फांद्यांचा गठ्ठा आहे. हे कुटुंबाचे एकमेव इंधन. कारण लाकूड खूप महाग आहे. या भागात कधीही वीज आली नाही आणि पाणी आणण्यासाठी दररोज खोऱ्यातील नदीपर्यंत तीन लांब जावं लागतं.'' (Image Credit- dawn.com) असं पाच मुलांची आई असलेल्या अमेना यांनी सांगितलं.
8 / 10
स्थानिक परिषदेचे उपप्रमुख 25 वर्षीय सैफुल्लाह आरिया म्हणतात की, ''परिस्थिती गंभीर आहे. इथले लोक खूप गरीब आहेत. ते साधारणपणे दिवसाला 100 - 200 कमावतात, पण गेल्या सहा आठवड्यांपासून त्यांनी काहीही केले नाही. बहुतेक लोक बटाटा आणि ब्रेडचे फक्त एकवेळ जेवतात.'' (Image Credit- dawn.com)
9 / 10
आरिया पुढे म्हणतात की, ''त्यांनी कधीही स्वयंसेवी संस्थांना खोऱ्यात पोहोचताना पाहिले नाही आणि स्थानिक बामियान अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मदतीसाठी केलेल्या विनंत्या अनुत्तरित आहेत. (Image Credit- dawn.com)
10 / 10
लवकरच हिवाळा येत असल्याने, येथील सर्वात दुर्बल लोक मरतील, हे निश्चित आहे. ' (Image Credit- dawn.com)
टॅग्स : तालिबानअफगाणिस्तानसोशल व्हायरल