Join us   

आलिया भटच्या डोहाळजेवणाचा थाटमाट, पिवळ्या धमक ड्रेसमध्ये दिसतेय अप्रतिम देखणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2022 5:23 PM

1 / 8
१. आलिया भटच्या गर्भधारणेविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आलियाचे बेबी बंपमधील फोटो, फॅशन, गर्भवती असताना ती करत असलेले काम या सगळ्यांबाबतच बरीच चर्चा आहे. आलियाचे बेबी शॉवर म्हणजेच डोहाळजेवण नुकतेच पार पडले. या लूकमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत होती. पिवळ्या धमक रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून आल्याचे दिसत होते (Alia Bhat Baby Shower Look Photos).
2 / 8
२. या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती. तिची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विशेषत: कुटुंबातील आणि जवळच्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होते.
3 / 8
३. रणबीर कपूरची सख्खी चुलत बहिण करिश्मा कपूरही या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. करिश्मानं त्या कार्यक्रमातला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र करीना कपूर यावेळी दिसली नाही.
4 / 8
४. रणबीर आणि आलियाची केमिस्ट्री आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. यावेळी रणबीरही आबोली रंगाच्या कुर्त्यामध्ये मस्त दिसत होता. आलियाने पिवळ्या रंगाच्या ड्रेससोबत कुंदन आणि मोती असलेला सेट परीधान केला होता, यामध्ये असलेल बिंदी आलियावर मस्त दिसत होती. तर अगदी बारीकशी टिकली लावत तिने आपला पारंपरिक लूक जपला होता. केस नेहमीप्रमाणे मोकळे सोडून तिने साधा लूक ठेवणेच पसंत केले होते.
5 / 8
५. आलिया आणि रणबीरनं यावेळी खास फोटोशूट केलं. आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले असून एका फोटोत हे दोघे आपल्या आणि बाळाच्या भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे दिसते.
6 / 8
६. आलियाच्या माहेरचं अख्खं कुटुंब या सोहोळ्यात हजर होतं. त्यांच्यासोबत बोलताना आलियाच्या चेहऱ्यावर असलेले भाव कॅमेरात अगदी परफेक्ट कैद झाले आहेत. आलियाच्या बहिणी, आई आणि निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यामध्ये आपल्याला दिसतात.
7 / 8
७. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि आलियाचे बॉंडींग आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असला तरी करण जोहरने या कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली होती. करणने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत आलिया-रणबीर सोबतचा डोहाळजेवणाच्या कार्यक्रमातला फोटो शेअर केला होता.
8 / 8
८. आलियाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात तिच्या काही खास मैत्रिणीही सहभागी झाल्या होत्या. अनारकली कुर्ता, त्याच रंगाची पँट आणि तशीच बारीक किनार असलेली ओढणी आलियाने अतिशय छान कॅरी केली होती. तिच्या चेहऱ्यावरच्या ग्लोसोबतच तिची खळीही नेहमीप्रमाणे खुलून दिसत होती.
टॅग्स : सोशल व्हायरलआलिया भटप्रेग्नंसीफॅशन