1 / 7गेल्या काही महिन्यांपासून बी टाऊनमध्ये आलियाच्या प्रेग्नन्सीमुळे ती आणि रणबीर बरेच चर्चेत आहेत. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून या दोघांनी आज गोड परीला जन्म दिला आहे (Alia bhat Ranbir kapoor Welcomes baby Girl). 2 / 7आलिया भट तिची प्रेग्नन्सी जाहीर झाल्यापासून तिची फॅशन, प्रेग्नन्सीतही ती करत असलेले काम, प्रेग्नन्सीबाबची तिची स्टेटमेंटस अशा वेगवेगळ्या गोष्टींवरुन चर्चेत होती. तर रणबीरही बाबा होणार असल्याने चर्चेत होता. 3 / 7कपूर कुटुंबिय आलिया आणि रणबीरच्या बाळाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते आणि आज आलियाने या लहानग्या परीला जन्म दिल्याने कपूर आणि भट कुटुंबियांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. 4 / 7आलियाला डिसेंबरमधील तारीख देण्यात आली होती. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तिने या गोड परीला जन्म दिला आहे. मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाने आपल्या बाळाला जन्म दिला असून आज सकाळी ७ वाजता ती रुग्णालयात दाखल झाली. 5 / 7आलियाची प्रसूती सी सेक्शन पद्धतीने झाली असल्याचे मीडिया रिपोर्टसमध्ये सांगण्यात आले आहे. दोघींची तब्येत चांगली असल्याचे म्हटले जात आहे. 6 / 7काही दिवसांपूर्वीच आलियाचे डोहाळजेवण पार पडले होते. त्यावेळी तिच्या आणि रणबीरच्या कुटुंबातील व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत होती. या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 7 / 7आलिया आणि रणबीर आलियाच्या प्रेग्नन्सीवरुन बरेच चर्चेत होते. कारण लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांनी गुड न्यूज शेअर केली होती. त्यामुळे आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचे बोलले जात होते.