Join us

कोण म्हणतं अभिनेत्री खूप उशिरा आई होतात? बघा तिशीच्या आत आई झालेल्या बॉलीवूड सेलिब्रिटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 17:48 IST

1 / 8
बॉलीवूड सेलिब्रिटी खूप उशिरा आई होतात, त्यांच्यासाठी त्यांचं करिअर जास्त महत्त्वाचं असतं असं बऱ्याचदा बोललं जातं. पण त्यात आता खूप बदल झाला आहे. कारण अशा अनेक सेलिब्रिटी आहेत ज्या तिशीच्या आतच आई झाल्या आहेत आणि शिवाय करिअरपण खूप उत्तमपणे करत आहेत.
2 / 8
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचं पहिलं बाळंतपण तिशीच्या आत व्हावं, असं डाॅक्टरही नेहमीच सांगत असतात. पण हल्ली करिअरमुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणूनच योग्य वयात आई होऊन करिअरमध्ये सुद्धा यशस्वी ठरलेल्या या काही अभिनेत्री पाहा..
3 / 8
आलिया भटने यशाच्या शिखरावर असताना लग्न केलं आणि लगेचच वयाच्या २९ व्या वर्षी ती आईसुद्धा झाली. मुलगी राहाच्या जन्मानंतर अवघ्या दिड- दोन महिन्यातच तिने पुन्हा काम करायला सुरुवात केली होती.
4 / 8
अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिने जेव्हा तिच्या मोठ्या मुलाला जन्म दिला तेव्हा ती २७ वर्षांची होती.
5 / 8
शाहिद कपूरची पत्नी मीरा हिचं लग्न खूप लवकर म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षीच झालं आणि २२ व्या वर्षी तिने मीशा या मुलीला जन्मही दिला.
6 / 8
स्टनिंग अभिनेत्री तसेच आलिया भटच्या सासुबाई नितू कपूर यांना त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षी पहिली मुलगी रीधिमा झाली तर २४ व्या वर्षी मुलगा रणबीर कपूर झाला.
7 / 8
काजोलला जेव्हा मुलगी झाली तेव्हा ती सुद्धा २९ वर्षांचीच होती.
8 / 8
डिंपल कपाडिया यांना वयाच्या १७ व्या वर्षीच मुलगी ट्विंकल झाली.
टॅग्स : सोशल व्हायरलआरोग्यप्रेग्नंसीआलिया भटजेनेलिया डिसूजाकाजोलडिम्पल कपाडिया