आलू - मिठी - जिराफ - नुष्की ही सगळी कुणाची नावं आहेत, माहीत आहे? पाहा तुम्ही त्यांना ओळखता का.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 3:21 PM 1 / 9'नावात काय आहे...??' असं थोर कवी, नाटककार विल्यम शेक्सपियर यांचं वाक्य आपल्या सगळ्यांनाच परिचयाचे असेल. तसं पहायला गेलं तर नावात बरच काही आहे. आपण जन्म घेतल्यानंतर आपले नाव ठेवले जाते तेव्हा आपली एक प्रकारची ओळख निर्माण होते. आपण केलेल्या चांगल्या, वाईट कामांमुळे आपले नाव लोकांच्या लक्षात राहते. प्रत्येकाला आपल्या नावासोबतच टोपण नाव देखील असतेच. आपल्या घरचे किंवा जवळचे खास मित्र - मैत्रिणी आपल्याला याच टोपण नावाने किंवा लाडाच्या नावाने हाक मारतात. कित्येकवेळा तर आपण काही व्यक्तींना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी टोपण नावानेच ओळखतो. काही व्यक्तींची टोपण नाव खूपच गमतीशीर असतात. अशी गमतीशीर टोपण नाव आपल्या कायम लक्षात राहतात. आपल्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्रींची देखील काही अशीच मजेदार टोपण नाव आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रींच टोपण नाव काय आहे पाहूया(Bollywood Actress Nicknames).2 / 9बॉलिवूडमध्ये, देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका चोपडाला लहानपणापासून घरात 'मिठी' या नावाने हाक मारली जाते. काही लोक तिला 'मिमी' या लाडाच्या नावाने देखील ओळखतात. 3 / 9सोनम कपूरचे वडील अनिल कपूर यांनी एका इंटरव्यू दरम्यान सोनमला घरी 'जिराफ' अशी सगळे लाडाने हाक मारतात, असा खुलासा केला होता. 4 / 9ऐश्वर्या रॉयला तिचे फॅन्स 'अॅश' या टोपण नावाने ओळखतात. विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्याला तिच्या घरचे 'गुल्लू' अशी लाडाने हाक मारतात. 5 / 9आलिया भट लहान असतांना खूपच हेल्दी आणि गुबऱ्या गालांची गोंडस बाळ होती. त्यामुळे लहानपणापासूनच आलियाचे नाव 'आलू' ठेवण्यात आले होते. 6 / 9अनुष्काला लहानपणापासूनच घरात 'नुशेश्वर' हे लाडाचे नाव मिळाले होते. लग्न झाल्यावर पति विराट कोहोली याने तिच्या नुशेश्वर या नावावरून तिला 'नुश्की' असे नवीन लाडाचे नाव ठेवले. विराट कोहोली अनुष्काला 'नुश्की' या नावानेच हाक मारतो. 7 / 9करिष्माला घरात लाडाने सगळेजण 'लोलो' अशी हाक मारतात. सिंधी भाषेमध्ये गोड चपातीला 'लोलो' असे म्हटले जाते. करिष्मा या चपाती प्रमाणेच गोड असल्यामुळे आम्ही तिला 'लोलो' अशी हाक मारतो. असा खुलासा तिची बहीण करीना कपूर हिने एका इंटरव्यू दरम्यान केला होता. 8 / 9कंगनाला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 'क्वीन' या टोपणनावाने ओळखले जाते. परंतु कंगना लहान असल्यापासून तिला घरात 'अरशद' याच नावाने हाक मारली जाते. अरशद' चा मराठी अर्थ भक्ती असा आहे. 9 / 9करीना कपूरचे टोपण नाव 'बेबो' आहे. तिच्या या टोपण नावावरून 'कंबक्त इश्क' या हिंदी चित्रपटांत 'बेबो मैं बेबो' असे बोल असणारे गाणे करीनावरच चित्रित केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications