लिप बाम एक काम अनेक ! फक्त ओठच नाही तर इतरही कामात फायदेशीर ठरेल हा इवलासा लिप बाम... Published:July 1, 2024 07:35 PM 2024-07-01T19:35:52+5:30 2024-07-01T19:46:28+5:30
7 Lip Balm Hacks You Should Know : 7 LIP BALM HACKS YOU’LL LOVE : ओठांच्या सौंदर्यासाठी लिप बामचा वापर करतो पण त्याचबरोबर लिप बामच्या मदतीने इतर देखील महत्वाची कामे करु शकतो. ओठांच्या सुंदरतेसाठी आपण नेहमी लिप बाम वापरतो. लिप बाम कोरड्या, खडबडीत ओठांना मऊ, मुलायम करतो. लिप बाम फाटलेला ओठांना योग्य ते पोषण देऊन त्यांना अधिक सुंदर बनविण्यात खूप मदत करतात. लिप बाम ओठांची चांगली काळजी घेतात. ओठ गुळगुळीत, पिंक व हायड्रेटेड ठेवायला लिप बाम लावणे गरजेचे असते. ओठांच्या सौंदर्यासाठी लिप बामचा वापर करतो पण त्याचबरोबर लिप बामच्या मदतीने इतर देखील महत्वाची कामे करु शकतो. आपल्या सर्वांना रोजच्या रुटीनमध्ये अनेक प्रकारच्या छोट्या-छोट्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही लिप बामची मदत घेऊ शकता(lip balm tips and hacks not for your lips).
१. अडकलेली चैन पुन्हा बसवण्यासाठी :-
जर एखाद्या कपड्याची किंवा बॅगेची चैन निसटली असेल तर ती पुन्हा बसवण्यासाठी आपण लिप बामचा वापर करु शकतो. यासाठी चैन अडकलेल्या भागाच्या पुढे थोडे लिप बाम लावावे यामुळे चैन व्यवस्थित बसेल.
२. लेदरच्या वस्तुंना पॉलिश करण्यासाठी :-
आपण जॅकेट, पाकिट, बेल्ट अशा अनेक लेदरच्या वस्तू वापरतो. या लेदरच्या वस्तूंना एक प्रकारची चकाकी असेल तरच त्या वापरण्यासाठी खूप छान दिसतात. अशावेळी या लेदरच्या वस्तूंना चकाकी येण्यासाठी आपण त्यावर लिप बाम लावू शकतो. लेदरच्या वस्तूंना लिप बाम लावून त्याचा एक थर द्यावा. त्यानंतर टिश्यू पेपरने हा थर पुसून घ्यावा. यामुळे लेदरच्या वस्तूंना चकाकी येते.
३. धातूच्या वस्तू चमकतील :-
धातूच्या वस्तू चमकवण्यासाठी आपण लिप बामचा वापर करु शकतो. किचनचा नळ किंवा दाराची हँडल यांना आपण लिप बाम लावून त्यांची हरवलेली चकाकी परत आणू शकतो. यासाठी धातूंच्या वस्तूंवर लिप बाम लावून त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावे, यामुळे धातूच्या जुन्या वस्तू परत नव्यासारख्या चमकू लागतील.
४. नखांचे क्यूटिकल मॉइश्चराइज करु शकता :-
जर तुमच्याकडे नखांचे क्युटिकल्स मॉइश्चराइज करण्यासाठी क्यूटिकल ऑइल नसेल तर आपण लिप बामचा वापर करु शकता. यासाठी तुमच्या क्युटिकल्सवर लिप बाम लावा आणि मसाज करा. लिप बाम तुमच्या क्यूटिकलना हायड्रेटेड ठेवेल.
५. अंगठी काढण्यासाठी :-
अनेकवेळा अंगठी आपल्या बोटातच अडकते आणि नंतर ती काढणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत लिप बाम वापरुन आपण अंगठी सहजपणे काढू शकता. यासाठी अंगठीच्याभोवती लिप बाम लावा आणि अलगद अंगठी पुढे सरकवा यामुळे अंगठी बोटातून निघण्यास मदत होईल.
६. परफ्यूम बेस म्हणून :-
परफ्यूम मारण्यापूर्वी त्या जागेवर लिप बाम लावा यामुळे परफ्यूमचा सुगंध जास्त काळ राहतो.
७. आय मेकप रिमूवर :-
डोळ्यांना केलेला मेकअप सहजासहजी निघत नाही. त्यातच वॉटरप्रूफ मेकअप काढणं सर्वात जास्त कठीण गोष्ट असते. यासाठी लिप बामचा वापर करता येऊ शकतो. लिप बाम हलक्या हातांनी डोळ्यांवर लावा त्यानंतर कापसाने किंवा टिश्यू पेपरने डोळे सावकाश पुसा. यामुळे डोळ्याजवळच्या त्वचेला किंवा डोळ्यांना कोणतंही नुकसान न होता आय मेकप लगेच काढला जाईल.