Bathroom toilet cleaning hacks : कितीही स्वच्छ केलं तरी टॉयलेट, बाथरूममधून वास येतो? 5 उपाय, दुर्गंध कमी होऊन घर नेहमी वाटेल फ्रेश By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 1:07 PM 1 / 8कधीकधी आपल्या घरातील स्वच्छतेचा अभाव बाथरूममधील दुर्गंधीचे कारण बनतो. काही वेळा बाथरूमचा वास इतका येतो की त्याचा संपूर्ण घरात दुर्गंध पसरू लागतो. (Hacks to Keep Your Toilet Clean) अर्थात अशा स्थितीत आपल्याला खूप त्रास होतो आणि कधी कधी तर काय होईल याचा अंदाजही लावता येत नाही. प्रोफेशनल बाथरुम साफसफाईसाठीही खूप खर्च येतो आणि प्रत्येक वेळी ती पूर्ण करणे शक्य नसते. (How to get rid of toilet smell)2 / 8बाथरूममधील दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी काही DIY पद्धतींचा वापर करता येऊ शकतो. (Toilet Cleaning Hacks for Your Bathroom) आम्ही तुम्हाला काही DIY आणि इतर काही पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे स्वस्त किमतीत बाजारात उपलब्ध आहेत, जे बाथरूमच्या वासावर नियंत्रण ठेवू शकतात. (Home Cleaning Tips)3 / 8 शौचालय खूप जुनं असल्यास ते बदलणं किंवा पुन्हा काम करून घेणं आवश्यक आहे. जुन्या बाथरूम, टॉयलेटमध्ये दुर्गंधी कायम राहते. अनेक ठिकाणांहून तडे येतात जे जैविक वाढीला आमंत्रण देतात आणि त्यामुळे समस्या वाढतात.4 / 8तुमच्या ड्रेनेजमध्ये खूप केस असू शकतात. त्यामुळे दुर्गंध अधिकच वाढत जातो. केसांमुळे केवळ नाले तुंबते असे नाही तर साबणाचे कण, खरकटे इ. खूप साचतात. बाथरूममध्ये हवेचा प्रवाह खूपच कमी असल्यामुळे अशा समस्या उद्भवतात.5 / 8तुमच्या बाथरूमचे व्हेंटिलेशन योग्य नसेल तरच तुमचा कोणताही उपाय उपयुक्त ठरणार नाही. बाथरूममध्ये खिडकी असेल तर ती उघडा आणि हवा ताजी ठेवा, लाईट असेल तर स्वच्छ करा, फक्त एक्झॉस्ट फॅन असेल तर स्वच्छ करा आणि व्हेंटिलेशन सुधारा. जर व्हेंटिलेशन चांगले नसेल तर बाथरूमचा वास तिथेच राहतो आणि त्यामुळे बाथरूममध्ये सतत दुर्गंधी येत राहते.6 / 8तुम्ही बाथ बॉम्बबद्दल ऐकले असेलच, पण आजकाल टॉयलेट बॉम्ब खूप ट्रेंडी झाले आहेत. तुम्हाला फक्त ते टॉयलेट बाऊलमध्ये ठेवावे लागेल आणि तुमचे काम सोपे होईल. यामुळे टॉयलेटचा वास आपोआप निघून जाईल आणि काही खुणा असतील तर त्याही दूर होतील. बे बॉम्ब तुम्ही सहजपणे ऑनलाइन ऑर्डर करू शकता आणि ही पद्धत तुमच्यासाठी खूप सोयीस्कर असेल.7 / 8वारंवार त्याच पद्धतीने बाथरूम धुतल्याने समस्या वाढतात. कारण बाथरूममध्ये अशाच प्रकारच्या रसायनांचा वापर केल्याने त्यांना वेगळा वास येतो. 1/2 कप बेकिंग सोडा, १/२ कप व्हिनेगर, थोडासा लिंबाचा रस, इसेंशियल ऑईलचे काही थेंब, वापरून ड्रेनेज होल, बाथरूम स्वच्छ करू शकता. यामुळे नक्कीच बाथरूम फ्रेश सुगंध देईल.8 / 8तुम्ही DIY बाथरूम स्प्रे देखील वापरू शकता. यासाठी तुम्ही 3/4 कप पाणी, 2 tablespoons अल्कोहोल घ्या, इसेंशियल ऑईलचे 5-6 थेंब, ते चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा आणि पुन्हा पुन्हा याची टॉयलेट, बाथरूमध्ये फवारणी करा. आणखी वाचा Subscribe to Notifications