दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

Updated:November 10, 2023 12:18 IST2023-11-07T10:02:14+5:302023-11-10T12:18:57+5:30

Best Diwali ideas in 2023 Rangoli Designs : या रांगोळ्या काढायला फार अवघड नाहीत. तुम्ही यासाठी चाळणी, कंगवा, पिन्स अशा टुल्सचा वापर करू शकता.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

दिवाळीत (Diwali 2023) रांगोळ्या काढल्याशिवाय घराला शोभा येत नाही. आकर्षक रांगोळ्या दाराबाहेर, देव्हाऱ्यासमोर काढल्या की मन प्रसन्न होतं. काढायला सोप्या, सुंदर रांगोळ्याचे काही डिजाईन्स पाहूया. कमीत कमी वेळात उठून दिसणाऱ्या रांगोळ्या काढता येतील. (Easy rangoli designs for diwali)

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

यंदा १२ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरू होत आहे. दिवाळीला कोणत्या रांगोळ्या काढायच्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दारावर खुलून दिसतील अशा नवनवीन रांगोळी डिजाईन्सचे पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील.(Easy rangoli designs for Diwali 2022)

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

जर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी काढणार असाल तर बारीक रांगोळी घ्या किंवा जर तुम्ही संस्कार भारती रांगोळी काढणार असाल तर जाड रांगोळी विकत आणा.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

रांगोळीच्या मधोमध एका सर्कलमध्ये कोणताही रंग भरून त्यात पांढऱ्या रांगोळीने शुभ दिपावली असे लिहू शकता. किंवा धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन असे त्या त्या दिवसांचे नावही लिहू शकता.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

या रांगोळ्या काढायला फार अवघड नाहीत. तुम्ही यासाठी चाळणी, कंगवा, पिन्स अशा टुल्सचा वापर करू शकता.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

धनत्रयोदशीला तुम्ही लक्ष्मीच्या पाऊलांची रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला बाजारात रेडिमेड ठसे उपलब्ध होतील.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

एकाच रांगोळी भरपूर रंगाचा वापर करून तुम्ही कलरफूल रांगोळी काढू शकता. एक ठिपका काढून माचिसच्या काडीच्या साहाय्याने त्याला आकार देऊ शकता.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

जर तुम्हाला सिंपल रांगोळी आवडत असेल तर तुम्ही एक गोल काढून त्यात इतर रंग भरू शकता किंवा हॅप्पी दिवाळी असा मेसेज लिहू शकता.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची रांगोळी काढून घर सजवू शकता.

दिवाळीला कमी वेळात काढा सिंपल, आकर्षक रांगोळ्या; घ्या युनिक डिजाईन्स-उठून दिसेल रांगोळी

मोठी रांगोळी काढण्यासाठी आधी खडूने रांगोळी काढून घ्या. जेणेकरून पटकन रांगोळी काढून होईल.