दिवाळीत दिव्यांसोबत फोटो काढता पण कधीच चांगले येत नाहीत? ७ सोप्या पोझ, लाइक्सचा पडेल पाऊस
Updated:November 11, 2023 10:34 IST2023-11-11T10:29:12+5:302023-11-11T10:34:32+5:30

दिवाळीमध्ये बहुतांश जणी हमखास दिव्यांसोबत, पणतीसोबत फोटो काढतात. पण बऱ्याचदा आपल्याला पाहिजे असतो, तसा आकर्षक फोटो येतच नाही.
त्यासाठीच बघा या काही खास पोझ. एकापेक्षा एक सुंदर फोटो येतील. शिवाय सोशल मिडियावरही तुमचे फोटो एकदम हिट हाेऊन जातील.
दिव्यांचं ताट हातात घेऊन हा असा फोटो काढू शकता. पाेझ घेऊन काढला तरी बघणाऱ्याला तो कॅण्डिड वाटेल.
अंकिता लोखंडेचा हा फोटोही मस्त आहे. कधी कधी आपले असे वन साईड फोटोही छान येतात.
दिवे लावताना अशी एखादी पोझ घेऊन फोटो काढला तरी खूप सुंदर येईल.
थोडासा ट्रेण्डी आणि हटके फोटो काढायचा असेल तर आलियाची ही स्टाईल फॉलो करायला हरकत नाही.
बहिणीसोबत, मैत्रिणीसोबत फोटो काढायला ही पोझ बघा एकदम बेस्ट आहे. शिवाय हा फोटो कॅण्डीड वाटतो.