Join us   

लोक नावे ठेवतील म्हणून घाबरून जगायचं का? सारा अली खान जगते बिन्धास्त, करते सवाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 1:14 PM

1 / 9
नुकतीच महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी हा एक सण आहे. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी सारा अली खान हिने केदारनाथ आणि उज्जैन येथे जाऊन भगवान महादेवांचे दर्शन घेतले. मात्र त्यामुळे साराला नेटकऱ्यांनी भरपूर ट्रोल केले. साराने आतापर्यंत चित्रपटांत भरपूर वेगळ्या धाटणीचे रोल केले आहेत. चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच ती रियल लाईफमध्ये देखील तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. लोक नाव ठेवतील, ट्रोल करतील या गोष्टींना न जुमानता आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे त्याच्यासाठी सारा भरपूर मेहेनत घेताना दिसते(Bindaas & Bold, Charming, Carefree Sara Ali Khan).
2 / 9
बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान ही भगवान शंकरांची खूप मोठी भक्त असल्याचे दिसून येत आहे. सारा तिच्या व्यग्र कामातून थोडासा वेळ काढून भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात अवश्य जाते.
3 / 9
यंदाच्या महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान सारा पुन्हा एकदा भगवान महादेवांच्या भक्तीत लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
4 / 9
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांची आराधना करतानाचे काही फोटोज साराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
5 / 9
भगवान शंकराच्या पूजेदरम्यान साराने आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा, भक्तिभावाने गळयात चुनरी घालून भगवान महादेवांचे दर्शन घेतले. तिचा हा भक्तिभाव बघून भगवान महादेवांवर तिचा अतूट विश्वास असल्याचे दिसून येत आहे.
6 / 9
सारा अली खानची आश्चर्यचकित करणारी वेट लॉस जर्नी खूपच इंटरेस्टिंग आहे. योग्य डाएट व जिमचा आधार घेत तिने जवळपास ४० किलो वजन कमी केले आहे. जी लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी सारानं दिलेल्या टिप्स अतिशय उपयोगी पडू शकतात.
7 / 9
मध्यंतरी साराने आपले नो - मेकअप लूकमधील फोटोज चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवरून शेअर केले होते. यात ती मेकअप न करता देखील खूप सुंदर दिसत आहे.
8 / 9
सारा अली खानला कित्येक वर्ष पीसीओडी (PCOD) आजाराचा सामना करावा लागला. एका टॉक शो दरम्यान, साराने आपल्याला पीसीओडी (PCOD) असल्याचे सर्वांसमोर सांगितले होते. पीसीओडी मुळेच तिने वजन झपाट्याने वाढत होते. पीसीओडी (PCOD) पासून मुक्तता मिळविण्यासाठी तिने डाएट, एक्सरसाइज व योगाचा आधार घेतला होता.
9 / 9
वेटलॉस जर्नी, पीसीओडी, नो - मेकअप लूक, शिवभक्ती या सगळ्याच गोष्टी करत असताना साराने कोणताच विचार न करता बिनधास्त व बेधडकपणे आपल्याला जे आवडले ते करण्याचा निश्चय केल्याचे दिसून येते. लोक नाव ठेवतील, नेटकरी ट्रोल करतील या गोष्टींचा तिळमात्रही विचार न करणारी सारा जिगरबाजच आहे, असे म्हणावे लागेल.
टॅग्स : फिटनेस टिप्सफॅशन