रक्षाबंधन स्पेशल : सेलीब्रिटी बहीण - भावांच्या पाहा खास जोड्या, एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात कायमच...
Updated:August 17, 2024 20:16 IST2024-08-17T20:06:03+5:302024-08-17T20:16:56+5:30
Celebrity Raksha Bandhan : शुटिंग्स, टाईट शेड्युल मधून राखीपौर्णिमेच्या दिवशी वेळ काढून हे भाऊ आपल्या बहिणींकडून आवर्जून राखी बांधून घेतात.

रक्षाबंधन हा बहीणभावांचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी म्हणजेच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या प्रत्येकाच्या भावना अत्यंत वेगळ्या असतात. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. राखीपौर्णिमा हा प्रत्येक बहीण - भावांच्या आयुष्यातील खास सण. बहीण - भावाच्या नात्यात दरवर्षी एकापेक्षा अनेक आठवणींची भर घालणारा हा दिवस. प्रत्येक भावा - बहिणीला हवाहवासा वाटणारा सण. मग यामध्ये आपले लाडके सेलिब्रिटी मागे कसे राहतील. शुटिंग्स आणि टाईट शेड्युल मधून वेळ काढून राखीपौर्णिमेच्या दिवशी खास वेळ काढून हे भाऊ आपल्या बहिणींकडे जातात आणि आवर्जून राखी बांधून घेतात. बॉलिवूड मधील काही हिट सेलिब्रिटी भाऊ - बहिणींमधील नातेसंबंध कसे आहेत ते पाहूयात(Celebrity Raksha Bandhan).
१. सलमान खान आणि अलविरा, अर्पिता :-
अभिनेता सलमान खानच्या दोन बहिणी आहेत. अलविरा आणि अर्पिता अशी या दोघींची नावे आहेत. पण या दोघींबरोबरच सलमानची एक राखी सिस्टरही आहे. श्वेता रोहिरा असे सलमानच्या या तिसऱ्या बहिणीचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सलमान खान त्याच्या तीन बहिणींकडून राखी बांधून घेतो. पण केवळ रक्षाबंधलाच नव्हे तर नेहमीच सलमान त्याच्या बहिणींना चांगली साथ देत असतो.
२. अर्जुन आणि जान्हवी कपूर :-
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या दोन्ही भावंडांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावले आहे. जान्हवी जरी अर्जुनची सावत्र बहीण असली, तरी दोघांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचा बंध आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
३. सैफ अली खान आणि सोहा अली खान :-
पतौडी घराण्याचा नवाब म्हणजेच अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री सोहा अली खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिणींच्या जोड्यांपैकी एक आहेत. सैफ आणि सोहा या दोघांनीही बॉलिवूडमध्ये दमदार अभिनय केले आहे. सैफला आणखी एक बहीण देखील आहे, जिचे नाव सबा अली खान आहे. सबा ही ज्वेलरी डिझायनर आहे.
४. फरहान अख्तर आणि झोया अख्तर :-
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि झोया अख्तर या दोघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. झोया अख्तर हिने निर्माती बनून स्वतःला सिद्ध केले आहे. तर फरहानने आपल्या अभिनयाने आणि आपल्या इतर अनेक कौशल्यांनी लोकांची मने जिंकली आहेत.
५. सोनम आणि हर्षवर्धन कपूर :-
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी सोनम कपूर हे देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध भावंडांपैकी एक आहेत. रक्षाबंधनाला दोघेही अनेकदा एकत्र फोटो शेअर करताना दिसतात. यासोबतच सोनम आणि हर्षवर्धन या दोघांनीही बॉलिवूडमध्ये काम केले आहे.
६. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान :-
नव्या पिढीचे कलाकार अर्थात सारा आणि इब्राहिम अली खान बी-टाऊनमधील सर्वात स्टायलिश भावंडांपैकी एक आहेत. जिममध्ये जाण्यापासून ते सायकलिंगपर्यंत, सारा आणि इब्राहिम एकत्र भरपूर वेळ घालवतात.
७. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन :-
श्वेता अभिषेक पेक्षा मोठी आहे. सोशल मिडीयावर नेहमीच या भावा - बहिणींचे प्रेम व्यक्त होताना दिसते. अभिषेकने अनेकदा श्वेतासाठी सोशल मिडीयावर पोस्ट लिहिली आहे.
८. शाहरुख खान आणि शहनाज खान :-
शाहरुखची मोठी बहीण शहनाज त्याच्यासोबतच राहते परंतु ती लाइमलाईटपासून खूप दूर असल्याने ती क्वचितच दिसते. शहनाजची तब्येत ठिक नसल्याने आईच्या निधनानंतर शाहरुख आपल्या बहिणीची पूर्ण काळजी घेतो.