1 / 7१. लग्नातलीच साडी ॲवॉर्ड फंक्शनसाठी घातल्यामुळे अभिनेत्री आलिया भट सध्या जबरदस्त चर्चेत आहे. तेच ते कपडे रिपिट करणं हे सर्वसामान्य लोकांचं काम. बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमीच वेगवेगळ्या कपड्यांत दिसतात. पण कधीतरी त्यांनाही त्यांचे आवडीचे कपडे पुन्हा- पुन्हा घालण्याचा मोह होतोच...असा मोह होऊन कपडे रिपिट करणाऱ्या या अभिनेत्री पाहा.... 2 / 7२. आलियानेच आणखी एकदा तिचे कपडे रिपिट केले आहेत. २०१८ साली तिच्या आईच्या म्हणजेच सोनी राजदान यांच्या वाढदिवसाला जो ड्रेस तिने घातला होता, तोच ड्रेस तिने तिच्या नणंदेच्या म्हणजेच रिद्धिमा कपूर हिच्या वाढदिवसाला २०२० साली घातला होता.3 / 7३. जेनेलियाने जो घागरा तिच्या दिराच्या म्हणजेच रितेश देशमुखच्या भावाच्या लग्नात घातला होता, तोच घागरा तिने ३ वर्षांनंतर तिच्या भावाच्या लग्नात घातला.4 / 7४. गौरी खान हिनेही तिची सेक्विन वर्क असणारी लाल साडी एकदा रिपिट केली होती. 5 / 7५. अनुष्का शर्मा हिने तिचा टी- शर्ट, पॅण्ट आणि डेनिम जॅकेट असा सगळा ड्रेसच रिपिट केला आहे. दोन्ही वेळा ती नवरा विराट कोहली याच्यासोबतच होती. शिवाय दोन्ही वेळा ती विमानतळावरच दिसून आली. कदाचित प्रवासात तिला तो ड्रेस खूप जास्त आरामदायी वाटत असावा.6 / 7६. अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनेही हा सुंदर पांढरा अनारकली ड्रेस रिपिट केला आहे. 7 / 7७. अंबानी परिवाराची धाकटी सून राधिका मर्चंट ही देखील दोन वेळा एकाच ड्रेसमध्ये दिसून आली.