ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 4:44 PM 1 / 8बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सगळ्याच गोष्टी भव्य असतात. त्यात जर त्यांच्या लग्नाचा सोहळा असेल तर तो थाट विचारायलाच नको. साधेपणाने लग्न करणारे सेलिब्रिटी खूपच कमी आहेत.2 / 8त्यामध्ये कोर्ट मॅरेज करणाऱ्या सेलिब्रिटींची संख्या तर आणखीनच कमी.. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल. दोघांनीही मुंबईमध्ये अगदी साधेपणाने नोंदणी पद्धतीने नुकताच विवाह केला. 3 / 8 सैफ अली खान आणि करिना कपूर यांनीही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांसाठी रिसेप्शन दिलं.4 / 8धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांचंही कोर्ट मॅरेजच झालं होतं. 5 / 8कोर्ट मॅरेज करणारं आणखी एक सेलिब्रिटी दाम्पत्य म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर. दोघांचा विवाह अगदी साधेपणाने झाला होता.6 / 8अभिनेता संजय दत्त याने जेव्हा मान्यताशी दुसरा विवाह केला, तेव्हा तो ही त्याने नोंदणी पद्धतीनेच केला होता. 7 / 8स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनीही साधेपणाने कोर्ट मॅरेज केले होते. 8 / 8अभिनेता जॉन अब्राहम आणि प्रिया यांचा विवाहदेखील कोर्टात खूप साधेपणाने पार पडला. आणखी वाचा Subscribe to Notifications