Saas- Bahu Jodi in Bollywood: स्टार सासू- सुनेची कोणती जोडी तुमची फेवरिट? आलिया-नीतूची जमणार का अशीच केमिस्ट्री?
Updated:April 13, 2022 18:33 IST2022-04-13T18:22:37+5:302022-04-13T18:33:16+5:30

१. रणबीर कपूर- आलिया भट (Ranbir- Alia) यांचं शुभमंगल म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठाच चर्चेचा विषय... कपूर आणि भट ही बॉलीवूडची दोन्ही बडी घराणी यानिमित्ताने एकत्र येत आहेत..
२. रणबीरशी लग्न करून आता आलियाही ''The Kapoor'' कुटूंबाचा हिस्सा बनणार.. वेगवेगळी नाती तिच्याभोवती आपसूकच येणार.. पण या सगळ्या नात्यांपेक्षाही अतिशय महत्त्वाचं आणि ज्याबाबत भारतातल्या अनेक महिलांना उत्सूकता आहे, असं नातं म्हणजे सासू- सुनेचं नातंही तिला जपावं लागणार..
३. रणबीरच्या आई नीतू कपूर (Nitu Kapoor) या अतिशय कुल असून त्यांनी काही दिवसांपुर्वीच आलिया त्यांना पसंत असून सासू म्हणून त्यांना आलियाकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील सांगून टाकलंय..
४. नीतू यांचं त्यांच्या सासुबाईंशी म्हणजेच कृष्णा कपूर यांच्याशी अगदीच जिव्हाळ्याचं नातं होतं.. तसंच नातं त्यांचं आणि आलियाचं असावं, असं त्यांना वाटतं...नीतू आणि कृष्णा यांच्याप्रमाणेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी साँस- बहू जोडी प्रसिद्ध आहेत..
५. काजोल (Kajol) आणि वीणा देवगण ही अशीच प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी..
६. करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि शर्मिला टागोर यांची केमिस्ट्रीही अतिशय छान आहे..
७. सुरुवातीला ऐश्वर्या आणि जया (Aishwarya and Jaya Bachchan) यांच्यात खटके उडाल्याच्या, तु तु- मै मै झाल्याच्या बातम्या व्हायरल व्हायच्या.. पण आता मात्र दोघींचाही एकमेकींशी घट्ट बॉण्ड झाला आहे..
८. अभिनेत्री निलीमा अजीम आणि मीरा कपूर (Meera Kapoor) यांची जोडीही प्रसिद्ध आहे.. मीरा अभिनेत्री नसली तरी तिची लोकप्रियता कमालीची आहे..
९. राणी मुखर्जी आणि तिच्या सासुबाई पामेला चोप्रा यांचीही एकमेकींशी अशीच घट्ट मैत्री...
१०. आता आलिया आणि नीतूचं नातं यापैकी कोणत्या वळणाने जाणार हे काही दिवसांत समजेलच..