पेट्रोलियम जेली फक्त ओठांनाच लावता? घरातली ‘ही’ कामंही जेलीनं होतील फटाफट...
Updated:March 8, 2025 17:24 IST2025-03-08T17:08:37+5:302025-03-08T17:24:55+5:30
Check Out 10 Amazing Uses Of Petroleum Jelly : Top 10 Unexpected Uses Of Petroleum Jelly For Everyday : 10 Unexpected Ways To Use Petroleum Jelly : पेट्रोलियम जेली फक्त ओठांनाच लावता ? पाहा १० भन्नाट उपयोग...

आपल्या सगळ्यांच्या बॅगेत पेट्रोलियम जेलीची एक छोटी (10 Unexpected Ways To Use Petroleum Jelly) डबी असतेच. थंडीच्या दिवसांत ही पेट्रोलियम जेली वापरणे फारच उपयुक्त ठरते. फुटलेले ओठ, स्किन यावर लावण्यासाठी पेट्रोलियम जेली अधिकच उपयोगी ठरते.
परंतु कपड्यांवरील लिप्स्टिकचे डाग (Check Out 10 Amazing Uses Of Petroleum Jelly) काढण्यापासून - बुटांना चमक यावी इथपर्यंत अशा इतर वेगवेगळ्या लहान - मोठ्या कामांसाठी देखील पेट्रोलियम जेलीचा वापर केला जातो. ओठांवर लावण्याव्यतिरिक्त पेट्रोलियम जेली वापरुन कोणकोणती काम करता येतात ते पाहूयात.
१. दारे-खिडक्यांचा आवाज कमी करण्यासाठी :-
जर तुमच्या घरातील दरवाज्यांचा उघडझाप करताना आवाज होत असेल तर दरवाज्याच्या कडांवर पेट्रोलियम जेली लावा. असं केल्यास दरवाज्याचा आवाज येणार नाही. पेट्रोलियम जेली उत्तम वंगण म्हणून काम करते.
२. बॅगेची चैन अडकली असेल तर :-
काहीवेळा आपल्या बॅगेची चैन ही मध्येच अडकते. ती धड बंद करता येत नाही किंवा उघडताही येत नाही. अशावेळी या चैनीला थोडेशी पेट्रोलियम जेली चोळून लावावी. यामुळे फसलेली चैन पुन्हा पहिल्यासारखी होते.
३. होममेड शूज शायनर :-
फक्त कापडापासून बनवलेल्या चपला सोडल्यास पॉलीश चालणाऱ्या चपला, सँडल्स आणि बूट चमकविण्यासाठी पेट्रोलियम जेली हा उत्तम पर्याय आहे. थोडीशी पेट्रोलियम जेली घ्या आणि तुमच्या बूटांवर लावा, मग एखाद्या कपड्याने ती चांगली घासा. यामुळे तुमचे शूज चमकून निघतील.
४. परफ्युम जास्त काळ टिकण्यासाठी :-
जर दिवसभर परफ्युम लावून तुम्हाला कायम रिफ्रेश राहायचं असेल तर परफ्युम लावण्याआधी त्या जागेवर पेट्रोलियम जेली लावा. याने तुमचा परफ्युम जास्त काळ टिकण्यास मदत होईल. तसेच दर दोन तासांनी परत परफ्युम लावायची गरज नाही भासणार.
५. नेलपेंटच्या बाटलीचे झाकण घट्ट बसल्यास :-
नेलपेंटच्या बाटलीचे झाकण घट्ट बसल्यास ते काढण्यासाठी आपण या पेट्रोलियम जेलीचा वापर करु शकतो. यासाठी कॉटन बड्सवर थोडी पेट्रोलियम जेली घेईन ती बाटलीच्या तोंडाशी सर्वत्र लावून घ्यावी आणि मग झाकण लावावे. पेट्रोलियम जेलीच्या चिकटपणामुळे नेलपेंटच्या बाटलीचे झाकण घट्ट बसले असेल तरी ते उघडण्यास मदत होते.
६. कपड्यांवरील लिप्स्टिकचे डाग काढण्यासाठी :-
काहीवेळा मेकअप करताना चुकून लिप्स्टिक कपड्यांवर लागली तर हा लिपस्टिकचा डाग काढण्यासाठी जेलीचा वापर करा. पेट्रोलियम जेलीमध्ये बेकिंग सोडा मिक्स करून ते डागांवर लावा याने लिपस्टिकचा डाग निघून जाईल.
७. काचेवरील स्क्रॅच दूर करण्यासाठी :-
घरातील खिडक्यांच्या काचेवर जर स्क्रॅच आले असतील तर ते घालविण्यासाठी पेट्रोलियम जेली घ्या. काचेच्या ज्या भागावर स्क्रॅच आले आहेत तिथे लावून मग कागदाच्या मदतीने पुसून घ्या. आठवड्यातून २ - ३ वेळा केल्यास काचेवरील स्क्रॅच मार्क्स दूर होतील.
८. नेलपेंट नीट लावण्यासाठी :-
नेलपेंट लावताना कधी कधी ते आपल्या नखांच्या कडांना लागते. असे नेलपेंट दिसताना व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नेलपेंट लावायच्या आधी नखांना पेट्रोलियम जेली लावल्यास त्यातील चिकटपणामुळे ते नखांच्या कडांना लागत नाही. अश्यारीतीने नेलपेंट नीट लावण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करा.
९. मेकअप रिमूव्हर :-
खूप हेव्ही मेकअप केला असेल तर तो काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर म्हणून पेट्रोलियम जेलीचा वापर करा. यामुळे चेहेऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा न होता मेकअप सहज रिमूव्ह करता येतो.
१०. नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी :-
नखांवर सातत्याने नेलपेंट लावल्यामुळे नखांचा चमकदारपणा कमी होतो. नखं निस्तेज आणि कोरडी दिसू लागतात. यासाठी नेलपेंट काढल्यावर नखांवर पेट्रोलियम जेली लावा ज्यामुळे त्यांना पुन्हा नैसर्गिक चमक मिळेल. नियमित हा उपाय केला तर तुमच्या नखांमधील नैसर्गिक चमकदारपणा टिकून राहील.