लक्ष्मीपुजनासाठी बघा ९ सुंदर रांगोळी डिझाइन्स, सुंदर रांगोळी झटपट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 11:14 AM 1 / 9१. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा अंगणात आपण मोठी आकर्षक रांगोळी तर काढतो. पण लक्ष्मीपुजनाची पूजा ज्या चौरंगावर किंवा पाटावर मांडली आहे, त्याच्यासमोर नेमकी कशी रांगोळी काढावी, हेच समजत नाही.2 / 9२. कधी कधी मोठ्या रांगोळ्या काढणं एकवेळ सोपं वाटतं. पण बॉर्डर डिझाईन्स कशा असाव्या, हे सुचत नाही. म्हणूनच या काही बॉर्डर डिझाईन्स बघा. दिवाळीत पुजेसमोर किंवा घराच्या अंगणाला बॉर्डर म्हणून त्या नक्कीच उपयोगी येतील. 3 / 9३. एखादं छानसं तोरण वाटावं, अशा पद्धतीची ही एक सुंदर सोपी रांगोळी. काढायला तसा खूप वेळही लागणार नाही. मध्ये लक्ष्मीची पावलं असल्याने लक्ष्मीपुजनासाठी ही रांगोळी परफेक्ट ठरेल.4 / 9४. तोरण रांगोळी किंवा बॉर्डर रांगोळी काढण्याचा हा आणखी एक प्रकार. साधं- सोपं डिझाईन दिसायला तर आकर्षक आहेच, पण काढायलाही सोपं आहे5 / 9५. या डिझाईनचं वरचं बॉर्डर काढण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने लाल ठिपके द्या. त्याच्या मध्ये पिवळे ठिपके द्या आणि बाजूला हिरवे ठिपके द्या. नंतर पिवळ्या आणि हिरव्या ठिपक्यांना काडेपेटीच्या काडीने असा छान पानांप्रमाणे आकार द्या. यानंतर मग खालचं डिझाईन काढा. 6 / 9६. रांगोळीप्रमाणेच फुलांच्या डिझाईनची बॉर्डरही पुजेसमोर अगदी उठून दिसते. त्यासाठी हे बघा एक छान डिझाईन7 / 9७. दसरा- दिवाळी या सणांच्या काळात झेंडूची फुलं बाजारात भरपूर आलेली असतात. त्यामुळे त्यांची किंमतही कमी असते. त्यांचा उपयोग करून अशी छान रांगोळी नक्कीच करता येईल. मधे असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या नाही मिळाल्या तर त्याऐवजी रांगोळीचा रंग किंवा शेवंतीच्या पाकळ्या, पाने असंही काही वापरू शकता. 8 / 9८. फुलं आणि रांगोळी यांचं छान कॉम्बिनेशन असलेली ही एक आकर्षक रांगोळी. 9 / 9९. पुजेसमोरची जागा खूप मोठी नसेल तर या काही नाजूक रांगोळी डिझाईन्सही छान दिसतील. आणखी वाचा Subscribe to Notifications