1 / 9१. घरातल्या काही वस्तूंवर पडलेले डाग निघता निघत नाही. त्यासाठी खूप मेहनत घेतली तरी डाग पुर्णपणे स्वच्छ होतच नाहीत. अशा डागांसाठी बेकिंगसोडा अतिशय उपयुक्त ठरतो.2 / 9२. इडली, ढोकळा, केक, पेस्ट्री अशा खाद्य पदार्थांना फुलविण्यासाठी बेकिंग सोडा जसा उपयुक्त ठरतो, तसंच तुमच्या घरातल्या अनेक कळकट, डागाळलेल्या वस्तूंना पुन्हा खुलविण्यासाठीही बेकिंग सोड्याचा खूप चांगला वापर करता येतो.3 / 9३. नेमक्या कोणकोणत्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येईल, ते आता बघूया.. 4 / 9४. घरात स्टीलचे जे नळ असतात, त्यावर बोअरिंगचं पाणी असेल तर पिवळसर डाग पडतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू वापरता येईल.5 / 9५. पांढऱ्या, पिवळसर फरशीवर सिलेंडर ठेवले, तर त्याचे डाग त्या फरशीवर दिसू लागतात. हे डाग काढून टाकण्यासाठीही बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. 6 / 9६. बाथरुममधील बादल्या, मग यावर पाण्याचे डाग पडतात. थोडंसं हार्पिक आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण वापरून हे डाग काढता येतात.7 / 9७. पडदे खूप मळाले असतील, तरीही ते धुण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग करता येतो. यासाठी एक बादली गरम पाणी घ्या. त्यात जेवढे डिटर्जंट टाकाल, तेवढाच बेकिंग सोडा टाका. या पाण्यात अर्धा ते पाऊण तास पडदे भिजत ठेवा. त्यानंतर धुवून टाका. पडदे अधिक स्वच्छ होतील.8 / 9८. गालिचावर पडलेले डाग अनेकदा कसे धुवावेत हा प्रश्न पडतो. यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात २ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण डागांवर लावा. अर्धा तास राहू द्या. त्यानंतर एक ओलसर कपडा घेऊन डागांवर चोळा.9 / 9९. स्वयंपाक घरातील जळकट भांडी स्वच्छ करण्यासाठीही बेकिंग सोडा वापरता येतो. त्यासाठी बेकिंग सोडा, लिक्विड सोप आणि लिंबू हे तिन्ही घटक एकत्र करून वापरावेत.