कपड्यांपासून फर्निचरपर्यंत... सगळं घर होईल चकाचक, बघा घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ६ भन्नाट उपयोग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 1:52 PM 1 / 8१. व्हाईट व्हिनेगर (white vinegar) खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जातं, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण त्याशिवायही घराच्या स्वच्छतेसाठी (white vinegar for cleaning purpose) त्याचा खूप चांगला उपयोग होतो. 2 / 8२. घरातल्या वेगवेगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर कसं उपयोगी ठरतं, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या homehacksco या पेजवर शेअर करण्यात आला आहे.3 / 8३. पांढरे कपडे अधिक स्वच्छ निघण्यासाठी आणि कपड्यांना मऊपणा येण्यासाठी व्हिनेगर वापरता येतं. दुसरं कोणतंही क्लॉथ सॉफ्टनर किंवा क्लॉथ कंडिशनर वापरण्यापेक्षा व्हिनेगर वापरल्याने अधिक चांगला परिणाम दिसून येतो.4 / 8४. फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेली फुलं अधिक दिवस फ्रेश रहावीत यासाठी फुले ज्या पाण्यात ठेवली असतील त्यात थोडे व्हिनेगर टाका. फुले टवटवीत दिसतील.5 / 8५. डिश वॉशर स्वच्छ करण्यासाठीही व्हाईट व्हिनेगरचा उपयोग होतो. यासाठी २ कप व्हिनेगर एका भांड्यात घालून ते भांडे इतर भांड्यांसोबत डिशवॉशरमध्ये ठेवा आणि ते वॉशर सुरू करा.6 / 8६. आरसा किंवा खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर अतिशय उपयुक्त ठरतं.7 / 8७. फर्निचरची चमक कमी झाल्यासारखी वाटत असेल तर व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑईल १: ३ या प्रमाणात घ्या आणि त्याने फर्निचर स्वच्छ करा. फर्निचर पुन्हा नव्यासारखे चमकेल.8 / 8८. बुटांवर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठीही व्हिनेगरचा उपयोग होतो. डागांवर थोडे व्हिनेगर टाका आणि कपड्याने पुसून घ्या. डाग स्वच्छ होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications