दसरा- दिवाळीत दाराला लावा ५ सुंदर तोरण, घरच्याघरी करायला सोपे- दिसायला आकर्षक आणि घर प्रसन्न By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 5:43 PM 1 / 9दसरा दिवाळीच्या काळात घराच्या प्रवेशद्वाराला आपण झेंडूच्या फुलांचं तोरण हमखास लावतो. आंब्याची पानं घालून झेंडूचं तोरण घरीच तयार करणं खूप सोपं तर आहेच पण त्यामुळे आपण स्वत:च्या हाताने काहीतरी करून घर सजविल्याचाही भरपूर आनंद मिळतो.(how to make zendu or marigold toran or garland for main door?)2 / 9तुम्हालाही यंदा स्वत:च्या हाताने घरासाठी तोरण तयार करायचं असेल तर या काही सुंदर- सोप्या डिझाईन्स पाहून घ्या (zendu toran designs).. तोरण करण्याचं काम सोपं होईल. या कामात मुलांनाही सोबत घ्या. त्यांनाही छान वाटेल..3 / 9तोरण तयार करण्यासाठी हे एक अतिशय सोपं डिझाईन पाहा. यामध्ये दोन शेडची फुलं एकानंतर एक ओवून त्याला आंब्याची पानं जोडली आहेत. दोन्ही बाजूंना दोन लटकन तयार केल्यामुळे त्याला खूप उठाव आला आहे.4 / 9हा प्रकारही वर दाखविलेल्या तोरणासारखाच आहे. यामध्ये फुलं खूप विरळ गुंफली आहेत. शिवाय दोन्ही बाजूंनी दोन- दोन लटकन तयार केले आहेत. जर दाराच्या आजुबाजुला मोकळी जागा असेल तर अशा प्रकारे तुम्ही लटकनची संख्या वाढवू शकता. (image credit - google)5 / 9हे तोरण दिसायला अवघड वाटलं तरी करायला खूप सोपं आहे. यासाठी फक्त थोडा मजबूत धागा वापरा. यात दाखविल्याप्रमाणे निशिगंधाची फुलं सहज मिळाली नाही तर आंब्याच्या पानांचं लटकन लावा. खूप छान वाटेल.6 / 9घराचं प्रवेशद्वार भव्य, मोठं असेल तर अशा पद्धतीचं तोरण छान दिसू शकतं.7 / 9काहीतरी वेगळं करायचं असेल तर अशा पद्धतीचं तोरण बनवून पाहा. यामध्ये हिरव्या पानांचा वापरही तुम्हाला जास्त करावा लागेल.8 / 9कमीतकमी वेळात साधं, सुटसुटीत पण आकर्षक तोरण तयार करायचं असेल तर हे डिझाईन तुम्ही ट्राय करून पाहू शकता. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications