Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

Published:October 21, 2022 05:05 PM2022-10-21T17:05:59+5:302022-10-21T17:17:19+5:30

Diwali Simple and Easy Rangoli Designs : दिव्यांच्या सणाला दारात रांगोळी कर हवीच, हीच रांगोळी काढण्यासाठी काही सोप्या आयडीया...

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी दारापुढे आकाशकंदिल, दिवे आणि रांगोळी तर हवीच. रांगोळी काढताना ती कशी काढावी, कुठून सुरुवात करावी हे सुचत नसेल तर पाहूया काही सोप्या डिझाईन्स (Diwali Simple and Easy Rangoli Designs)...

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

रांगोळीसाठी तुमच्याकडे कलात्मकता असणे आवश्यक असते. पण ही कलात्मकता नाही म्हणून रांगोळी काढता येत नाही असं नाही. त्यासाठी काही सोप्या हॅक्सचा वापर करुन आपण रांगोळी नक्कीच काढू शकतो. आधी खडूने डिझाईन काढून घेऊन त्यावर रांगोळी काढल्यास काम सोपे होऊ शकते.

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

रांगोळी म्हणजे मोठमोठाले गालिचेच हवेत असे नाही. तर दारात काढली जाणारी रांगोळी ही जितकी सुबक आणि नेटकी तितकी ती छान दिसते. दिवाळीच्या दिवसांत रंगांचा वापर करुन छोटीशी पण सुबक रांगोळी काढली तर दार नकळत छान सजते.

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

आपल्याला रांगोळी फारशी नीट जमत नसेल तर फुलांच्या रांगोळीचा एक सोपा पर्याय आपल्यासमोर असतो. बाजारात मिळणारी विविध रंगाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून ही रांगोळी अगदी सहज तयार होते आणि ती दिसतेही खूप सुंदर. त्यामुळे अशी रांगोळी तुम्ही अगदी झटपट काढू शकता.

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

तुम्हाला गडद रंग आवडत असतील आणि फार वेळ घालवायचा नसेल तर दिवे लावता येतील आणि छानही दिसेल अशी एखादी साधी सोपी रांगोळी काढून घराचा दरवाजा, पॅसेज सजवता येऊ शकतो.

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

सध्या यु ट्यूबवर रांगोळ्यांचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहून तुम्ही एखादी छानशी अशी रांगोळी नक्की काढू शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे वेळ आणि पेशन्स असणे आवश्यक आहे.

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

पूर्वी महिला तासनतास बसून दारापुढे किंवा अंगणात रांगोळी काढत असत. आता तितका वेळ नसल्याने ही कला काहीशी मागे पडली आहे. मात्र आता बाजारात रांगोळी काढणे सोपे व्हावे यासाठी बरीच उपकरणे अगदी सहज उपलब्ध होतात. त्यांचा वापर करुन आपण सुबक रांगोळी नक्कीच काढू शकतो.

Diwali 2022 : दिवाळीत दारासमोर काढा सुरेख रांगोळी अगदी कमी वेळात, पाहा ८ सुंदर डिझाइन्स- वाढवा दाराची शोभा

आपल्या घरापुढे जीना आणि पायऱ्या असतील तर आपल्याला फार मोठी रांगोळी काढता येतेच असं नाही. अशावेळी जिन्याच्या कडेने छानसे छाप किंवा रांगोळी काढून आपण दरवाज्यातील जागा सजवू शकतो.