Diwali Decoration: कुंड्या- रोपं वापरून घर सजविण्याच्या खास टिप्स, पाहुण्यांसाठी करा सुंदर डेकोरेशन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 12:29 PM 1 / 6दिवाळीत लाईटिंग, पणत्या, आकाशदिवा लावून आपण सगळेच जण घर सजवतो (Diwali Decoration ideas). पण सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं, हटके असं काही करायचं असेल तर या काही टिप्स बघा (diwali decoration using indoor plants).. यामध्ये आप ना दिवाळीत आपल्या टेरेसमधल्या कुंड्या आणि रोपं वापरून घरातला एक कोपरा छान हिरवागार कसा करायचा ते पाहूया...(how to decorate home using indoor plants?)2 / 6तुमच्याकडे जर शोपीस ठेवण्याचं एखादं कपाट असेल तर त्यामध्ये तुम्ही टेरेसमधल्या किंवा मग बाल्कनीमधल्या वेगवेगळ्या कुंड्या आणून ठेवा आणि मग त्यांच्यावर छानशी लायटिंग सोडा. खूप छान पद्धतीने घरातला एक कोपरा सजवला जाईल.3 / 6दिव्यांचं डेकोरेशन करणार असाल तर मध्यभागी अशा पद्धतीने एखादं रोप ठेवा आणि मग त्याच्या आजुबाजुने दिवे लावा आणि सजावट करा. 4 / 6तुमच्याकडे काही इनडोअर प्लांट्स असतील तर ते सगळे एकत्र ठेवा. त्यांच्या आसपास काही शोपीस ठेवा आणि अशा पद्धतीने दिवे लावून सुंदर सजावट करा.5 / 6घरात हॉलमध्ये अशा पद्धतीने जशी जागा असेल तशी रोपं लावून त्यांच्यावर लायटिंग करून अशा पद्धतीने दिवाळीसाठी आकर्षक डेकोरेशन करू शकता.6 / 6घरातला एक कोपरा अशा पद्धतीने रोपं आणि गार्डनिंगच्या इतर डेकोरेटीव्ह वस्तू वापरून सुशोभित करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications