Diwali Rangoli 2024 : दिवाळीत मुलांसह काढा १० सोप्या कार्टून रांगोळ्या; मुलांनाही शिकवा रांगोळी काढण्यातली गंमत
Updated:October 26, 2024 21:02 IST2024-10-26T20:49:03+5:302024-10-26T21:02:25+5:30
Diwali Rangoli 2024 : मुलांना आवडतात कार्टून. पिकाचू, डोरेमॉन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, छोटा भीम हे त्यांचे मित्रच.

आई -आजी किंवा बाबाही रांगोळी काढू लागले की मुलांना लूडबूड करायची असते, त्यांचा हट्ट आम्ही रांगोळी काढतो.
पण ठिपक्यांची किंवा नक्षीची रांगोळी येत नाही, त्यात रंगांची सांडलवंड करतात. त्यामुळे त्यांना आवडेल अशीच रांगोळी त्यांना शिकवली तर
मुलांना आवडतात कार्टून. पिकाचू, डोरेमॉन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, छोटा भीम हे त्यांचे मित्रच. त्यांचंच चित्र रांगोळी म्हणून काढायला दिलं तर..
ही आयडिया या दिवाळीत वापरुन पाहा, अतिशय आनंदानं मुलंही या कार्टून रांगोळी काढतील.
मुलांना त्यांच्या आवडत्या कार्टूनची आऊटलाइन काढून द्या. चित्र द्या. ते आनंदाने रंग भरतील.
त्यांना स्वत:च पूर्ण चित्र काढायचं असेल तरी चालेल वेळ लागेल पण मुलं रमतील या खेळात.
दिवाळीच्या सुटीत मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
दिवाळी म्हणजे केवळ खरेदी नाही तर आपण स्वत: काही करणं, प्रसन्न करणं आपला भवताल हे ही तितकेच महत्वाचे हे मुलांनाही कळेल.