Diwali Rangoli Design : दारासमोर रांगोळीनं काढा सुंदर दिवे- दिव्यांच्या रांगोळ्यांचे १० डिझाइन्स-दारासमोर सुरेख नक्षी Published:October 22, 2024 03:40 PM 2024-10-22T15:40:54+5:30 2024-10-22T16:33:41+5:30
Diwali Special Latest Rangoli Design : या रांगोळी डिजाईन्स काढायला अगदी सोप्या आहेत. दिव्याच्या रांगोळीची थिम तुम्ही दिवाळीच्या रांगोळी डिजाईन्ससाठी ट्राय करू शकतात. दिपावलीचा (Dipawali 2024) सण रांगोळीशिवाय अपूर्ण आहे. दिवाळीत प्रत्येकाच्या घराच्या समोर तुम्हाला आकर्षक रांगोळ्या पाहायला मिळतील. रांगोळी काढायला बसलं की काय काढावं ते सुचत नाही. म्हणूनच रांगोळ्यांच्या काही सोप्या आकर्षक डिजाईन्स पाहूया. (Diwali Special Diya Rangoli Designs Latest Patterns)
या रांगोळी डिजाईन्स काढायला अगदी सोप्या आहेत. दिव्याच्या रांगोळीची थिम तुम्ही दिवाळीच्या रांगोळी डिजाईन्ससाठी ट्राय करू शकता.
यात समई, पणत्या, छोटे दिवे यांचे आकार तुम्हाला रांगोळीनं काढावे लागतील.
रांगोळीच्या डिजाईन्स जितक्या कलरफूल असतात तितक्यात जास्त उठून दिसतात.
दिव्याची ज्योती काढण्याासठी लाल आणि ऑरेंज रंगाची बॉर्डर काढून तुम्हीमध्ये पिवळा रंग भरू शकता.
दिव्याच्या खालच्या भागात मोर, स्वास्तिक, कमळसुद्धा काढता येईल
मध्ये दिवा आणि आजूबाजूला फुलांच्या डिजाईनचा सर्कल काढल्यास रांगोळी उठून दिसेल.
दिव्याची रांगोळी तुम्हाला हातानं काढायला जमत नसेल तर तुम्ही बाजारातून रेडीमेड स्टेसिल्स आणू शकता.
दिव्याची रांगोळी तुम्ही फक्त दिवाळीच्या दिवसातं काढू शकता. त्यामुळे यावर्षी या युनिक डिजाईन्स नक्की ट्राय करा
(Image Credit-Social Media)