पणती सजविण्याच्या एकापेक्षा एक सुंदर ६ आयडिया, नुसत्याच रंगरंगोटीपेक्षा असं काहीतरी कल्पक करा....
Updated:November 6, 2023 16:06 IST2023-11-06T16:01:31+5:302023-11-06T16:06:22+5:30

साध्या गेरु रंगाच्या पणत्यांचं एक वेगळंच सौंदर्य असतं. पण त्यांच्यावर थोडी कलाकुसर करून आपण त्यांच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकू शकतो...
म्हणूनच आता पणती सजविण्याच्या या काही छानशा आयडिया पाहूया.. नुसतेच रंग वापरून पणतीवर रंगरंगोटी करण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच पणत्या आणखी छान दिसतील.
लक्ष्मीपुजनाच्या पुजेसाठी किंवा रांगोळीत ठेवण्यासाठी किंवा मग घरात सजावट म्हणून ठेवण्यासाठी तुम्ही अशी पणती सजवू शकता. अतिशय कल्पकतेने ही रचना करण्यात आली आहे.
पणतीवर अशाप्रकारे मोती लावूनही तुम्ही सजवू शकता. मोत्याची अशी एकच माळ लावा किंवा मग संपूर्ण पणतीवर बाहेरच्या बाजुने मोती लावून ती सुशोभित करा...
मोतीऐवजी असे कुंदन लावले तरी चालेल... कुंदन लावल्याने पणती वातीच्या प्रकाशात छान चमकते.
पणत्यांप्रमाणेच मेणबत्तीलाही अशाप्रकारे छान सुशोभित करता येईल.
अशा वेगळ्या आकाराच्या पणत्याही घेता येईल. कारण त्यांच्यावर खूप छान पद्धतीने रंगरंगोटी करता येते.
पणत्यांवर रंगरंगोटी करायची असल्यास हे काही डिझाईन्सही पाहून घ्या....