पणती सजविण्याच्या एकापेक्षा एक सुंदर ६ आयडिया, नुसत्याच रंगरंगोटीपेक्षा असं काहीतरी कल्पक करा.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 4:01 PM 1 / 8साध्या गेरु रंगाच्या पणत्यांचं एक वेगळंच सौंदर्य असतं. पण त्यांच्यावर थोडी कलाकुसर करून आपण त्यांच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकू शकतो...2 / 8म्हणूनच आता पणती सजविण्याच्या या काही छानशा आयडिया पाहूया.. नुसतेच रंग वापरून पणतीवर रंगरंगोटी करण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच पणत्या आणखी छान दिसतील.3 / 8लक्ष्मीपुजनाच्या पुजेसाठी किंवा रांगोळीत ठेवण्यासाठी किंवा मग घरात सजावट म्हणून ठेवण्यासाठी तुम्ही अशी पणती सजवू शकता. अतिशय कल्पकतेने ही रचना करण्यात आली आहे. 4 / 8पणतीवर अशाप्रकारे मोती लावूनही तुम्ही सजवू शकता. मोत्याची अशी एकच माळ लावा किंवा मग संपूर्ण पणतीवर बाहेरच्या बाजुने मोती लावून ती सुशोभित करा...5 / 8मोतीऐवजी असे कुंदन लावले तरी चालेल... कुंदन लावल्याने पणती वातीच्या प्रकाशात छान चमकते.6 / 8पणत्यांप्रमाणेच मेणबत्तीलाही अशाप्रकारे छान सुशोभित करता येईल.7 / 8अशा वेगळ्या आकाराच्या पणत्याही घेता येईल. कारण त्यांच्यावर खूप छान पद्धतीने रंगरंगोटी करता येते. 8 / 8पणत्यांवर रंगरंगोटी करायची असल्यास हे काही डिझाईन्सही पाहून घ्या.... आणखी वाचा Subscribe to Notifications