प्रत्येक धुण्यात कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? २ पदार्थ वापरून धुवा- जुने झाले तरी रंग उडणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 4:19 PM 1 / 6कॉटनच्या कपड्यांचा धुतल्यानंतर रंग जातो. बऱ्याचदा तर असं होतं की आपण जितक्यावेळा कपडे धुतो, तितक्यावेळा त्यांचा रंग जातो. त्यामुळे मग ते कपडे लवकरच भुरकट, जुनाट दिसू लागतात. 2 / 6म्हणूनच कॉटनच्या कपड्यांचा रंग उडून ते जुनाट दिसू नयेत म्हणून हा उपाय करून पाहा. अगदी जुने झाले तरी कपड्यांचा रंग जशास तसाच राहील. 3 / 6हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये थंड पाणी घ्या. साधारण ५ ते ७ लीटर पाणी असेल तर त्यामध्ये १०० ग्रॅम तुरटी टाका.4 / 6त्याच पाण्यामध्ये १०० ग्रॅम मीठ टाका. त्यानंतर तुरटी आणि मीठ वितळेपर्यंत पाणी हलवत राहा. 5 / 6यानंतर कॉटनचा कपडा त्या पाण्यात बुडवा आणि २ तासांसाठी तसाच भिजवून ठेवा. यावेळी त्या कपड्याचा थोडाफार रंग निघू शकतो. त्यानंतर तो कपडा पाण्यातून काढा आणि सावलीमध्ये वाळत टाका. 6 / 6वरील प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा तो कपडा धुवाल, तेव्हा त्याचा रंग मुळीच जाणार नाही. एकदा हा प्रयोग करून पाहा. आणखी वाचा Subscribe to Notifications