प्लास्टिकच्या ' या ' ६ वस्तू तुम्ही स्वयंपाकघरात वापरता? १०० % आजारी पडाल, बघा काय घोळ होतोय..
Updated:February 10, 2025 14:49 IST2025-02-10T14:37:35+5:302025-02-10T14:49:39+5:30
Do you use these 6 plastic items in the kitchen? then You will get sick 100% : प्लास्टिकचा वापर करु नका. त्याऐवजी या वस्तू वापरा.

इको फ्रेन्डली वस्तु वापरा. प्लास्टिक वापरणं बंद करा. असं म्हणणं फार सोप असतं. पण आपल्याला प्लास्टिक वापरायची एवढी सवय झाली आहे की, ते ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोप नाही. रोजच आपण काही ना काही प्लास्टिक वापरतोच. पण प्लास्टिक जसे निसर्गासाठी चांगले नाही, तसेच आरोग्यासाठीही नाही.
काही प्लास्टिकच्या वस्तू आहेत, ज्या आपण आरामात रिप्लेस करु शकतो. आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्लास्टिकच्या ऐवजी विविध वस्तू वापरल्या होत्या तर, आपणही वापर करुच शकतो.
१.प्लास्टिकच्या पिशवीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. त्याऐवजी भाजी वगैरे आणण्यासाठी कापडाची पिशवी वापरा. कागदी पिशव्या वापरा. काही द्रव्य असेल तर, अॅल्युमिनियम फॉईलच्या पिशव्या वापरा. वापरल्यावर तुम्हाला कळेल की, हे पर्याय जास्त फायदेशीर आहेत.
२.पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या आपण वापरतो. त्यांचा वापर बंद करा. त्यांच्याऐवजी धातुंच्या बाटल्यांचा वापर करा. स्टीलच्या बाटल्या वापरा. तसेच तांब्याच्या बाटल्या आजकाल बाजारात मिळतात. त्या वापरा.
३.प्लास्टिकचे डबे आपण वापरतो. त्याऐवजी फूड-ग्रेड सिलिकॉनचे डबे वापरा. तसेच स्टेनलेस स्टील, काच, सिरेमिक यांचे डबे वापरा. ते जास्त टिकाऊ असतात. तसेच ते पर्यावरण पूरक असतात.
४.घरी काही कार्यक्रम असला की, आपण प्लास्टिकचे ग्लास, ताटल्या, वाट्या वापरतो. त्याऐवजी आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आलेल्या पत्रावळ्या वापरा. केळीचे पान वापरा. शहराच्या ठिकाणी ते उपलब्ध न झाल्यास, बाजारात बांबूपासून तयार केल्या वस्तू मिळतात. त्या वापरा. वाट्यांच्या ऐवजी पानांचे द्रोण वापरा. अनेक जणांनी हे बदल आत्मसात केले आहेत. तुम्हीही करा.
५.दात घासण्यासाठी प्लास्टिक ब्रश आपण वापरतो. त्याऐवजी बांबूचा ब्रश वापरा. तो दातांच्या आरोग्यासाठीही चांगला असतो.
६.प्लॅस्टिकच्या स्ट्रॉऐवजी बांबूचा किंवा मेटलचा स्ट्रॉ आजकाल विकत मिळतो. त्याचा वापर करा. त्यांचा पुर्नवापरही करता येतो. किंवा इटेबल स्ट्रॉ मिळतात, ते वापरा.
७.घरातील कटलरीसाठी बांबूच्या वस्तू वापरा. तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन तयार केलेल्या वस्तू आता सगळीकडे मिळतात. त्या वापरा.
८.आता अनेक कंपन्या वस्तू रॅप करण्यासाठी कागदाचा किंवा पुठ्याचा वापर करतात. इतर वापराच्या गोष्टी ठेवण्यासाठी पत्र्याच्या डब्यांचा देखील काही कंपन्या वापर करतात. त्या कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरा.
९.प्लास्टिक फूड बॅगपेक्षा सिलिकॉन फुड बॅग्स वापरा. त्यात अन्नही जास्त चांगलं राहतं. प्लास्टिकचे गुणधर्म अन्नात उतरतात. सिलिकॉन अगदीच सुरक्षित असते.
१०. एवढं सगळं करूनही घरात थोडं प्लास्टिक येणारच आहे. कारण आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू प्लास्टिकमध्येच बांधलेल्या असतात. पण त्यावरही उपाय आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, रॅपर आदींचा चुरा करून त्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. असे काम करणाऱ्या कंपन्यांना ते सगळं प्लास्टिक द्या. गुगलवर त्यांचा संपर्क क्रमांक आरामात सापडेल. असा व्यवसाय करणारे तुमच्या परिसरातील लोक शोधा.