स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

Published:August 28, 2024 04:36 PM2024-08-28T16:36:51+5:302024-08-28T16:44:34+5:30

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

स्वयंपाक घरातल्या स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. त्यामुळे तिथल्या वस्तूंच्या स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे.

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

स्वयंपाक घरातल्या काही वस्तू अशा असतात की ज्या आपण मुळीच वर्षांनुवर्षे वापरू नयेत. वेळोवेळी त्या वस्तू बदललायला पाहिजेत. (change these 5 things from your kitchen time to time)

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

त्यापैकी सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे चॉपिंग पॅड. तो लाकडाचा असो किंवा मग प्लास्टिकचा असो, एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरू नये.

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

दुसरी वस्तू म्हणजे स्वयंपाक घरातले हात पुसण्याचे आणि भांडी पुसण्याचे नॅपकिन्स. स्वच्छ धुतल्यानंतरही ते नॅपकिन्स कडक राहत असतील, त्यांच्यातून एक प्रकारचा कुबट वास येत असेल तर आता ते नॅपकिन्स बदलण्याची वेळ झाली आहे हे ओळखा.

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

तिसरी गोष्ट म्हणजे गॅस, किचन ओटा तसेच डायनिंग टेबल पुसण्याचा कपडा. हा कपडा तर दर २ ते ३ महिन्यांनी बदलायला हवा.

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

स्वयंपाक घरातले प्लास्टिकचे भांडेही वेळोवेळी बदलायला हवेत. वर्षांनुवर्षांपासून त्याच त्या जुन्या प्लास्टिकच्या बरण्या वापरू नका. त्या बरण्या जेव्हा भुरकट होतात आणि त्यांच्यातून कुबट किंवा एक वेगळाच वास यायला सुरुवात होते तेव्हा त्या बरण्या बदलून टाकाव्या.

स्वयंपाक घरातल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरू नका; आरोग्यावर हाेऊ शकतात वाईट परिणाम

एकदा फोडलेले मसाल्यांचे पाकीट तुम्ही कित्येक महिने फ्रीजमध्ये ठेवून देत असाल तर ते सुद्धा वापरणे चांगले नाही. एकदा फोडलेले मसाल्याचे पाकीट फार फार तर दीड ते दोन महिन्यात संपवून टाकायला हवे.